Nashik News : प्रसूतिवेदना सहन करीत महिलेची अडीच किलोमीटर पायपीट! मृतदेह नेण्यासाठी करावी लागली डोली...

pregnant woman dies due to no suitable road nashik news
pregnant woman dies due to no suitable road nashik news esakal

Nashik News : गावाला रस्ता नसल्याने संबंधित गरोदर महिला आपल्या नातेवाइकांसह पहाटे अडीचला अडीच किलोमीटर चालत रुग्णालयात पोहोचली. पायपीट, प्रसूतिवेदना, पाऊस यामुळे झालेल्या विलंबामुळे या महिलेने रुग्णालयात येताच प्राण सोडला.

तिचा मृतदेह घरी नेण्यासाठीही चक्क झोळी करून तिला आज दुपारी नेण्यात आले. (pregnant woman dies due to no suitable road nashik news)

करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाला व ज्यांच्यावर ग्रामस्थांची भिस्त आहे, अशा लोकप्रतिनिधींसाठी लाजिरवाणी असणारी ही घटना आहे. या गावात तातडीने रस्ता करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केली आहे.

तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून, मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किलोमीटर अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे.

जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. मंगळवारी (ता. २५) पहाटे अडीचला रुग्णालयात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

pregnant woman dies due to no suitable road nashik news
Nashik News: कसारा घाटात मुदतबाह्य औषधे-इंजेक्शन! आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती

जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यात झोपविण्यात आले. रुग्णालयात पोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरी नेण्यासाठीही रस्त्याची समस्या असल्याने डोली करून न्यावे लागले.

या घटनेमुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. गरज नसलेल्या भागात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात येत असतात. मात्र, जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र नाशिक जिल्ह्यात आहे.

pregnant woman dies due to no suitable road nashik news
Nashik Crime: आधारकार्डच्या ठशांचा दुरुपयोग प्रकरणी पोलिसांची कारवाई; 3 लाख रुपये हस्तगत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com