esakal | नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : चौकशी समितीशिवाय पोलिसांकडूनही स्वतंत्र चौकशी

बोलून बातमी शोधा

nashik oxygen gas leakage
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : चौकशी समितीशिवाय पोलिसांकडूनही स्वतंत्र चौकशी
sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील २४ मृत्यूंच्या चौकशीसाठी शासनाने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असताना पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरु केली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी हा तपास सहाय्यक आयुक्‍तांकडे दिला आहे.

नेमकी काय होती परिस्थीती?

वरिष्ठ निरीक्षक सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार बुधवारी (ता.२१) दुपारी साडे बाराला डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीची गळती झाल्याने तेथे पोहोचण्याचे आदेश झाले. त्यानुसार तेथे पोहोचल्यावर ऑक्सिजन टँकर (एमएच १६ एई ७५७३) मधून पांढऱ्या रंगाचा धूर बाहेर येत असल्याने महापालिका कर्मचारी व अग्निशमन दलाचे पथकाने पावने दोन ते दोनच्या सुमारास गळती बंद केली. दरम्यान रुग्णालयातील रुग्णांना १३ केएल क्षमतेच्या गोलाकार टाकीतून आॅक्सीजन पुरवठा होतो १५० रुग्ण क्षमतेच्या कोवीड रुग्णालयात १५७ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३१ रुग्ण आॅक्सीजन तर १५ व्हेटींलेटरवर तर ६१ रुग्ण अत्यवस्थ स्थितीत उपचार घेत होते.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

दुर्घटनेतील मृतांची नावे

गळती दरम्यान ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने अमरदीप नगराळे (वय ७४), भारती निकम (वय ४४), श्रावण रामदास पाटील (वय ६७), मोहन देवराम खैरनार (वय ६०) मानसी सुरेंद्र शहा (वय ३६), पंढरीनाथ देवचंद्र नेरकर (३७), सुनील झाल्टे (वय ३३), सलमा शेख (५९), प्रमोद वाळूकर (४५), आशा शर्मा (४५), भैय्या सय्यद (४५), प्रवीण महाले (३४), सुगंधाबाई थोरात (६५), हरिणबाई त्रिभुवन (६५), रजनी काळे (वय ६१) गिता वाकचौरे (५०), बापूसाहेब घोटेकर (६१), वत्सलाबाई सूर्यवंशी (७०), नारायण इरांक (७३),संदीप लोखंडे (३७), बुधा गोतरणे (६९), वैशाली राऊत (४६) अशा १२ पुरुष १० महिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गॅस गळतीस जबाबदार असलेल्या व्‍यक्तीविरोधात हलगर्जीपणा व निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा