नाशिक पंचवटी एक्स्प्रेसमधील समस्येने प्रवासी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Panchavati Express traveler

नाशिक पंचवटी एक्स्प्रेसमधील समस्येने प्रवासी त्रस्त

नाशिक रोड : नाशिककरांची प्रवास वाहिनी समजली जाणारी पंचवटी एक्स्प्रेसच्या समस्येत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत वाढ होत आहे. या गाडीत नाशिक आणि मनमाडहून जवळपास दीड हजार प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या समस्या लोकप्रतिनिधींसह रेल्वे बोर्डाने सोडवाव्यात, अशी मागणी प्रवासी, नोकरदार, व्यावसायिक व चाकरमानी करीत आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : कोंडून घेताच अधिकाऱ्याने दिली मोजणीची तारीख

दादर, कल्याण, सीएसटी, कसारा व इतर भागांमध्ये खासगी व सरकारी शासकीय, अनुदानित संस्था, खासगी कार्यालयांमध्ये कामकाज सुरू झालेले आहे.

नाशिकहून ड्यूटीसाठी मुंबईत जाणारे तीन हजारावर नोकरदार आहेत. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या महत्त्वाच्या रेल्वे आहे. सध्या नाशिककरांना परवडणारे पंचवटी एक्स्प्रेसच्या समस्येत वाढ झाली आहे. या समस्या लोकसभेत मांडले जाण्यासाठी प्रवाशांनी लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरला आहे. पंचवटी रोज स्वच्छ होत नाही. त्याचप्रमाणे पंचवटीचा पास व तिकीट इतर ट्रेनला चालत नाही.

हेही वाचा: पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

याशिवाय रोजच पंचवटी उशिरा सीएसटीपर्यंत मार्गक्रमण करीत आहे. यामध्ये लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पंचवटी नाशिक ते कल्याण दरम्यान कुठेही थांबवली जाते. त्यामुळे नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या महिलांची बोगी नाही. चाकरमान्यांसाठी स्पेशल डबा नाही, एसी पास बंद आहे. शिवाय जनरलच्या बोग्या कमी केल्या असून, शहरातील व मनमाड शहरातील नोकरदारांना स्पेशल डबे नाही. आधी १८ बोग्या होत्या आता सध्या सहा आहे. पाहिले ६५० रुपये होता, आता ८४० रुपये आहे.

''रोज नवी आव्हाने घेऊन रेल्वेने प्रवास करत आहे. मध्य रेल्वेने आमच्याबरोबर प्रवास करावा आणि आमच्या समस्या जाणून घ्याव्यात. रेल्वे रोज उशिराने धावत असल्यामुळे नोकरीवर उशिरा पोचतो. पर्यायाने आर्थिक नुकसान होते.''

-नितीन जगताप, नियमित प्रवासी

Web Title: Nashik Panchavati Express Traveler Suffer From Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
go to top