
नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची मागणीदेखील वाढत आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेने नियमित पाण्याच्या मागणीत २०० दशलक्ष घनफुटाने वाढ केली आहे. एकूण पाच हजार आठशे दशलक्ष घनफूट पाण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. (Nashik people water demand increased 5800 TMC water proposal to Water supply department Nashik Latest Marathi News)
जलसंपदा विभागाकडून दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. पाणी नियोजन करताना स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच औद्योगिक विकास महामंडळे, औष्णिक विद्युत केंद्राकडून पाणी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविले जातात. दरवर्षी १५ सप्टेंबरपर्यंत मागणी नोंदवायची असते व १५ ऑक्टोबरपर्यंत मागणीनुसार किंवा परिस्थितीनुसार पाणी आरक्षित केले जाते.
त्यानुसार नाशिक महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १५ ऑक्टोबर ते ३१ जुलैअखेर अशा २९० दिवसांसाठी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत महापालिकेने २०० दशलक्ष घनफूट जादा पाणी मागणी केली आहे. मागील वर्षी ५ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी मंजूर करण्यात आली होती. या वर्षी ५८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली जाणार आहे.
गंगापूर धरणातून अतिरिक्त पाणी वाढविले
मागील वर्षी गंगापूर धरणातून चार हजार दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून २०० दशलक्ष घनफूट, तर मुकणे धरणातून १४०० दशलक्ष घनफूट असे एकूण पाच हजार सहाशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. या वर्षी गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून शंभर तर मुकणे धरणातून १५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
दारणा धरणातून दूषित पाणी उपसा होत असल्याने महापालिकेने पाणी मागणीत १०० दशलक्ष घनफुटाने कपात केली आहे. त्या ऐवजी गंगापूर धरणातून अतिरिक्त १०० दशलक्ष घनफूट पाणी वाढवण्यात आले आहे. पाणी आरक्षणाचा प्रस्ताव आयुक्तांना सादर करण्यात आला असून, त्यांच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.