Nashik Chain Snatching : सोनसाखळी खेचल्याच्या घटनांनी म्हसरुळ परिसरात दहशत

Chain Snatching : म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना घडल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Chain Snatching
Chain Snatching esakal

नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन दिवसात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या घटना घडल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस सोनसाखळी चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Nashik gold chain snatching incidents in area marathi news)

पेठरोडवरील सप्तरंग सोसायटीजवळ पादचारी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली. हिरावंती शामराव गवळी (रा. मैत्रप्रतिक अपार्टमेंट, सप्तरंग सोसायटीमागे, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २७) रात्री दहा वाजेच्या सुमारास राहत्या अपार्टमेंटबाहेर पायी फिरत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली.

याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक आहिरे तपास करीत आहेत. दुसरी घटना मखमलाबाद परिसरातील तांबे-बोराडे मळ्यात घडली. कांचन अमोल घुगे (रा. तांबे-बोराडे मळा, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २८) सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील १ लाख ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. (latest marathi news)

Chain Snatching
Chain Snatching : शहरात सोनसाखळी चोर मोकाट; 16 दिवसातील जबरी चोरीची 13वी घटना

याप्रकरणी म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक सुधील पाटील हे तपास करीत आहेत. दरम्यान, दोन दिवसात घडलेल्या या दोन घटनांचा पोलिस तपास करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.

परंतु अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागलेले नाही. मात्र या घटनांमुळे परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण असून, सोनसाखळी चोरट्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

Chain Snatching
Nashik Chain Snatching : शहरात सोनसाखळी चोर सुसाट! 14 दिवसात 6 घटना, वृद्ध महिला भामट्यांचे टार्गेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com