esakal | टोइंग कराराला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic

टोइंग कराराला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत टोइंग कराराला पोलिसांनी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवापासून दसरा - दिवाळीच्या सण उत्सवात खरेदीसाठी बाजारात निघालेल्या नागरिकांना नो पार्किंगमध्ये वाहन लावण्यापूर्वी विचार करावा लागणार आहे. अन्यथा ऐन सणासुदीत वाहन उचलण्यामुळे होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

शहरातील बेशिस्त वाहनावर कारवाईसाठी श्रमसाफल्य सर्व्हिसेस या संस्थेला पोलिस आयुक्तालयातर्फे टोइंगचा ठेका देण्यात आला आहे. ६ ऑक्टोबरला या ठेक्याची मुदत संपल्यानंतर गुरुवार (ता.७) पासून ६ जानेवारीपर्यंत तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदाधारकाचे सेवा करारातील अटी- शर्तीनुसार कामकाज समाधानकारक न आढळल्यास भ्रष्टाचारविषयक किंवा आर्थिक स्वरूपाच्या तक्रारी, गैरवर्तन आढळून आल्यास कोणतीही पूर्वसूचनेशिवाय करार संपुष्टात आणता येणार आहे. त्यामुळे वाहन उचललेल्या तक्रारदारांना त्यांच्या वाहनाचे नुकसान, गैरवर्तनासह ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीविषयी थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्याची करारात सोय आहे.

वाहनाचा प्रकार जीएसटीसह कर्षित दर शासकीय तडजोड एकूण दंड

  • दोनचाकी वाहन ९० २०० २९०

  • तीनचाकी वाहन ०१ २०० २०१

  • चारचाकी वाहन ३५० २०० ५५०

loading image
go to top