Nashik Police Transfer : पोलिसांच्या विनंती बदल्या होणार; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागविले अर्ज

Police Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Police Transfer
Police Transferesakal

Nashik Police Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असून, सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलिस अधिकारी व विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या काही दिवसात होण्याची दाट शक्यता आहे. (Nashik Police Transfer background of Lok Sabha election marathi news)

त्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आल्याने उपनिरीक्षक ते वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपनिरीक्षक ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या जानेवारी २०२४ मध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तीन वर्षे व स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रामुख्याने बदल्या झाल्या.

आता नव्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा फेर आढावा घेतला जात आहे. यात पोलिस आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांमध्ये पोलिस उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहा वर्षे झालेले आहेत. असे सर्व अधिकारी बदल्यांसाठी पात्र ठरत आहेत. (latest marathi news)

Police Transfer
Nashik Police Transfer : नाशिक ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक देशमाने यांनी स्वीकारला पदभार

जानेवारीमध्ये झालेल्या बदल्यांमध्ये बहुतांशी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी अद्यापही काही अधिकारी कार्यरत आहेत. अशा अधिकाऱ्यांच्या येत्या आठवडाभरात किंवा एप्रिल महिन्यात बदल्या होण्याची शक्यता आहे. यामुळे शहर पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

‘विनंती’च्याही बदल्या

शहर पोलिस आयुक्तालय, पोलिस अधीक्षक कार्यालयात उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या कार्यकाल पूर्ण झालेला नाही. मात्र, त्यांनी विनंती बदली पाहिजे आहे, अशा अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी पाच एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मात्र बदलीसाठी ठोस कारणही द्यावे लागणार आहे.

Police Transfer
Nashik Police Transfer: आयजी बी .जी. शेखर यांच्या बदलीला स्थगिती! कॅटचा निकाल; नाशिक IG पद देण्याचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com