Nashik Political News : पिंपळगाव बाजार समितीतील संघर्ष विधानसभेचा ट्रेलर!

Political News : सहा महिन्यांपासून काहीसे शांत असलेले निफाडचे राजकीय पटल आमदार बनकर व माजी आमदार कदम द्वयींच्या चिखलफेकीने पुन्हा तापले.
Pimplegaon Market committee
Pimplegaon Market committeeesakal

पिंपळगाव बसवंत : पक्के राजकीय वैरी असले, की लहान-मोठे निमित्तही परपस्परांचे वाभाडे काढण्यास पुरे ठरते. पिंपळगाव बाजार समितीत (Pimpalgaon Bazaar samiti) चार दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांतून त्याचाच प्रत्यय येतो. निविदा प्रक्रियेवरून सत्ताधारी आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल कदम यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. अपक्ष संचालक यतीन कदम यांनी दोघांचा अट्टाहास स्वकियांना कामे मिळण्यासाठी असल्याचे सांगत यात उडी घेतली. (Nashik Political Pimpalgaon Bazaar samiti marathi news)

सहा महिन्यांपासून काहीसे शांत असलेले निफाडचे राजकीय पटल आमदार बनकर व माजी आमदार कदम द्वयींच्या चिखलफेकीने पुन्हा तापले. अर्थात या मागे आगामी विधानसभा निवडणूक हेच एकमेवर कारण आहे. दहा महिन्यांपूर्वी पिंपळगाव बाजार समितीची निवडणूक प्रचंड चुरशीत झाली.

निकालात सत्तेचे पारडे आमदार दिलीप बनकर यांच्याकडे झुकले. माजी आमदार अनिल कदम यांनी सहा उमेदवार निवडून आणले. यतीन कदम यांची अपक्ष म्हणून एंट्री झाली. विधानसभेच्या निवडणुकीचे तीन दावेदार एकाच सभागृहात आल्याने तेथील मासिक सभा गाजणार, हे निश्‍चित होते.

Pimplegaon Market committee
Konkan Politics : रायगड, रत्नागिरी जिंकण्यासाठी खोपोलीत धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ; 'या' दिवशी होणार जाहीर सभा

प्रारंभी तसे झाले, पण नंतर माजी आमदार कदम यांच्या गटाने संयमाने घेत कामकाजात सहकार्य केले. विळ्या भोपळ्याचे नाते असलेले दोन्ही नेते शांत झाल्याने दोघांचे कार्यकर्ते तर्क-वितर्क लढवीत होते.

त्या तर्क-वितर्कांना फोल ठरवत माजी आमदार कदम आमदार बनकर यांच्याशी निविदा प्रक्रियेवरून भिडले. अकरा कोटींच्या निविदेवरून उडालेला गदारोळ विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील. तोपर्यंत निविदा प्रक्रिया नियमात, की नियमबाह्य याचे गौडबंगाल बाहेर येईलही.

Pimplegaon Market committee
Mumbai Politics: काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का; तीन माजी नगरसेविकांचा शिवसेनेत प्रवेश

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com