Nashik News : ‘ग्लेनमार्क’च्या आक्राळेतील प्रकल्पात उत्पादनाला सुरवात : प्रेसिडेंट व ग्लोबल हेड ब्रिजलाल मोटवाणी

Nashik : अतिशय जलद गतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करीत ग्लेनमार्क हेल्थकेअर कंपनीने आपल्या भव्य नव्या प्रकल्पाचे काम पूर्ण करीत २० मार्चपासून उत्पादनाची यशस्वी चाचणी करीत उत्पादनाची सुरवात झाली.
Production started at Glenmark's project in Akral - President and Global Head - Brijlal
Production started at Glenmark's project in Akral - President and Global Head - Brijlalesakal

Nashik News : अतिशय जलद गतीने आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करीत ग्लेनमार्क हेल्थकेअर कंपनीने आपल्या भव्य नव्या प्रकल्पाचे काम पूर्ण करीत २० मार्चपासून उत्पादनाची यशस्वी चाचणी करीत उत्पादनाची सुरवात झाली. प्रेसिडेंट व ग्लोबल हेड ब्रिजलाल मोटवाणी यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. कोरोनानंतर कंपनीच्या उत्पादनाला वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीचे कॉर्पोरेटचे वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक अधिकारी किरण पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी नवीन प्रकल्पासाठी जागेचा शोध सुरू केला होता. (Nashik President and Global Head Brijlal Motwani statement of Production begins at Glenmark project in Akrale marathi news )

याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांना याची कुणकुण लागताच त्यांनी ‘एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क करीत त्याच्या मागणीबाबत सकारात्मक चर्चा करून त्यांना आक्राळे एमआयडीसी प्लॉट नंबर डी ७/८ चा भूखंड देण्यात आला होता. गेल्या वर्षीच त्यांनी ‘एमआयडीसी’कडे कायदेशीर भरणा करीत कंपनीने सुमारे दहा हजार मीटरचा भूखंड ताब्यात घेतला होता.

या भूखंडावर पहिल्या टप्प्यात सुमारे तीन हजार १४३.५७ स्क्वेअर मीटर बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात त्यापैकी दोन हजार २०० चौरस मीटरमध्ये प्रकल्प बांधकाम पूर्ण केले आहे. ‘ग्लेनमार्क’ने पहिल्या टप्प्यात २९ कोटींची गुंतवणूक करीत हा नवीन प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात खास करून लिक्विड ओरल उत्पादन तयार करण्यात येईल. (latest marathi news)

Production started at Glenmark's project in Akral - President and Global Head - Brijlal
Nashik News : वेतन अधीक्षकांकडून थकीत बिलांची अडवणूक; नीलेश साळुंखे यांच्यासह शिक्षकांनी केला पर्दाफाश

नाव : बिलास्टिन ओरल सोल्युशन्स, ॲलेक्स ड्रॉप्स, एस्कोरिल (लेव्होसाल्बुटामोल सल्फेट + ॲम्ब्रोक्सोल हायड्रोक्लोराइड आणि ग्वायफेनेसिन एक्सपेक्टरंट) याचे उत्पादन केले जाणार आहे. ही उत्पादने देशांतर्गत आणि नंतर निर्यात केली जातील. प्रामुख्याने रशिया, आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका आदी ठिकाणी निर्यात केली जाणार आहे. सध्या ४५ कायमस्वरूपी कर्मचारी आणि कंत्राटी कामगार आहेत. भविष्यासाठी अधिक मनुष्यबळ जोडण्यांचे नियोजनही व्यवस्थापनाचे आहे.

‘आक्राळे’ची फार्मा हबकडे वाटचाल

आक्राळे ‘एमआयडीसी’त ‘रिलायन्स’ने सर्वांत मोठ्या फार्मा उत्पादन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यानंतर फार्मा क्षेत्रात आता जगात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ग्लेनमार्क’नेही आक्राळेत आपला फार्मास्युटीकल उत्पादनाचा नवीन प्रकल्प साकारला. येणाऱ्या काळात नाशिकमधील आक्राळेची वाटचाल ही फार्मा हबकडे असेल.

''आक्राळेमधील आमच्या नवीन उत्पादन सुविधेत ऑपरेशन्स सुरू झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. ही अत्याधुनिक सुविधा वितरणाच्या आमच्या समर्पणावर भर देते. भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील रुग्णांना उच्च-गुणवत्तेची औषधे, ज्यामुळे ‘ग्लेनमार्क’ला त्याची जागतिक उंची अधिक वाढविता येणार आहे.''- ब्रिजलाल मोटवाणी, प्रेसिडेंट आणि ग्लोबल हेड, फॉर्म्युलेशन ऑपरेशन्स, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.

Production started at Glenmark's project in Akral - President and Global Head - Brijlal
Nashik News : रेडिरेकरनचे दर ‘जैसे थे’; बांधकाम व्यावसायिकांसह ग्राहकांना शासनाचा दिलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com