Nashik Goda Mahaarti
Nashik Goda Mahaartiesakal

Nashik Goda Mahaarti : प्रस्तावित एकत्रित गोदा महाआरतीचे सर्वच स्तरांतून स्वागत; अनेकांकडून एकाच महाआरतीचा आग्रह

Goda Mahaarti : गोदावरी नदीच्या महाआरतीसंदर्भात सुरू असलेल्या प्रस्तावित एकत्रित गोदाआरतीचे समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय अशा सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

Nashik Goda Mahaarti : गोदावरी नदीच्या महाआरतीसंदर्भात सुरू असलेल्या प्रस्तावित एकत्रित गोदाआरतीचे समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय अशा सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानंतर मोठे महत्त्व प्राप्त झालेल्या श्री गंगा गोदावरीच्या महाआरतीबाबत हिंदुत्ववादी संघटनांमध्येच उघडपणे दोन गट तयार झाल्यानंतर नाशिककरांनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. (nashik proposed combined Goda Maha Aarti was welcomed from all quarters marathi news)

दोन आरत्यांमुळे गोदेचा सन्मान नव्हे तर अवहेलना सुरू झाल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी नोंदविली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने दोन आरत्यांऐवजी एकाच महाआरतीचा आग्रह धरला आहे. शुक्रवारी (ता.१५) ‘सकाळ’मध्ये याबाबतचे वृत्त छापून येताच समाजातील अनेकांनी स्वतःहून संपर्क साधत एकाच महाआरतीसाठी आग्रह धरला आहे.

गोदावरीची एकत्रित आरती झाल्यास नाशिकबाबत वेगळा व सकारात्मक संदेश जाईल, तसेच नदीचे पावित्र्यही जपले जाईल, अशी अपेक्षा सार्वजनिक वाचनालय व नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केली. एकत्रित गोदाआरतीबरोबरच गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, अशी भूमिकाही प्रा. फडके यांनी मांडली. श्री सिद्धी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनीही एकत्रित गोदा महाआरतीचे स्वागत केले आहे.  (latest marathi news)

Nashik Goda Mahaarti
Goda Mahaarti : गोदाआरतीसाठी समितीला हवे पोलिस संरक्षण; आमदारांसह विविध संघटनांना निमंत्रण

एकत्रित महाआरतीमुळे शहराची धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी व सकारात्मक ओळख निर्माण होईल, अशा आशावाद जागवितानाच त्यामुळे गोदावरीची अवहेलनाही टळेल, असे मत डॉ. गुट्टे मांडले. गोदावरीच्या महाआरतीसाठी सर्वांनी एकत्र यावे, यातून नाशिककरांमधील एकजूटही दिसून येईल, शिवाय गोदावरीबरोबरच या शहराचाही सन्मान वाढेल, असे मत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी व्यक्त केले.

माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनीही दोन महाआरत्यांऐवजी एकच आरती झाल्यास तो गोदेबरोरच शहराचाही सन्मान ठरेल, असे सांगितले. शहरासाठी व नाशिकची जीवनदायिनी असलेल्या गोदेच्या सन्मानार्थ व एक चांगल्या व सकारात्मक कामांसाठी सर्वांनी पुढे येण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शुक्ल अन गायधनीही सकारात्मक

‘सकाळ’च्या याबाबतच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल व गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनीच त्याबाबत सकारात्मकता दाखविली, त्यांचेही समाजातील अनेकांनी स्वागत केले आहे.

Nashik Goda Mahaarti
Nashik Goda Mahaarti : एकत्रित गोदाआरतीसाठी दोन्ही गट सकारात्मक; तोडगा निघण्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com