Nashik Protest News : कर्मचारी संप, आंदोलनाचा अहवाल सहकार विभागाकडे; जिल्हा बॅंक प्रशासकांची नाराजी कायम

Nashik Protest : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप, आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक आणि यावर, प्रशासक, व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिला आहे.
strike
strikeesakal

Nashik Protest News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप, आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक आणि यावर, प्रशासक, व्यवस्थापकीय संचालकांनी राजीनामा दिला आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा बॅंक प्रशासनाकडून सहकार विभागाला पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. (Employee strike protest report to Cooperative Department)

त्यामुळे सहकार विभाग प्रशासक व व्यवस्थापकीय संचालक यांच्या राजीनाम्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रशासक प्रतापसिंह चव्हाण राजीनाम्यावर ठाम असून, त्यांची नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये शासनाने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे निवृत्त सहव्यवस्थापक चव्हाण यांची नियुक्ती केली होती. प्रशासक चव्हाण सव्वावर्षापासून अडचणीत असलेली बॅंक पूर्वपदावर आणण्यासाठी काम करीत आहेत.

यातच बॅंकेचा परवाना अडचणीत सापडला आहे. या कठीण परिस्थितीत ३१ मार्चअखेर समायोजन योजना, वसुली या माध्यमातून बॅंक काहीशी नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यवस्थापकीय संचालकांची झालेली नेमणूक व त्यांना देण्यात आलेली वेतनवाढ यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर आहे.

यातच, जिल्हा बँकेच्या तात्पुरते (कंत्राटी) कर्मचारी ३७२ हून अधिक कर्मचारी सेवकांना कायम करावे, त्यांना वेतनवाढ द्यावी, मेडिक्लेम सुविधा लागू करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही रजा व सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी ५ एप्रिलपासून संपावर गेले.  (latest marathi news)

strike
Nashik Teacher Protest : वेतन प्रणालीत नाव समाविष्टसाठी शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

यावर तोडगा न निघाल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. २४) बॅंकेत ठिय्या आंदोलन केले. या वेळी झालेल्या बैठकीत एका कर्मचाऱ्याने प्रशासकांनाच सुनावले. अपमानास्पद वागणूक मिळाल्याने प्रशासक चव्हाण संतप्त झाले. ते बैठक सोडून निघून गेले.

त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाराज चव्हाण यांनी शासनाकडे राजीनामा सादर केला. व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. याबाबतचा सविस्तर अहवाल सहकार विभाग तसेच शासनाला सादर करण्यात आला असल्याचे समजते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप कायम

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन मागे घेतले होते. परंतु, या कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वेतनवाढ झाल्याशिवाय माघार न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

strike
Nashik Protest News : आकाशवाणी टॉवरच्या भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com