Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागात आजपासून 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज | Nashik Rain Update Moderate rain forecast for 2 days from today in some parts of district Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Update News

Nashik Rain Update : जिल्ह्याच्या काही भागात आजपासून 2 दिवस मध्यम पावसाचा अंदाज

Nashik News : उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांसाठी ‘गुड न्यूज' आहे. जिल्ह्याच्या काही भागामध्ये शनिवारी (ता. ३) आणि रविवारी (ता. ४) मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Nashik Rain Update Moderate rain forecast for 2 days from today in some parts of district Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या काळात सोसाट्याचा वाऱ्याचा वेग तासाला ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. याशिवाय सोमवारी (ता. ५) हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शनिवार, रविवार, बुधवारी (ता. ७) आकाश अंशतः ढगाळ, तर सोमवारी आणि मंगळवारी (ता. ६) आकाश ढगाळ राहील. तापमान कमाल ३९ ते ४०, किमान २३ ते २४ अंश सेल्सिअस आणि वाऱ्याचा वेग तासाला २० ते २२ किलोमीटर राहील, असाही विभागाचा अंदाज आहे.