Rain Update : इगतपुरी तालुक्यात 24 तासात तुफानी बरसात; दारणासह मुकणे धरणही फुल्ल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darna Dam

Rain Update : इगतपुरी तालुक्यात 24 तासात तुफानी बरसात; दारणासह मुकणे धरणही फुल्ल!

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असुन आजही अतिवृष्टी कायम राहीली असल्याने इगतपुरी तालुका जलमय झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही भरमसाठ पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व मोठी व मध्यम धरणे ओव्हर फ्लो झाली असून मुसळधारेसह संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे २४ तासात १२३ मिलीमीटरची धुव्वाधार तसेच तुफानी बरसात झाली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यात एकुण १७१ टक्के पावसाची विक्रमी नोंद घेण्यात असुन आज अखेर एकुण ४ हजार ५०० मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आल्याची माहिती तहसिल सुत्रांनी दिली.

इगतपुरी तालुक्यात गेल्या आठवडेभरापासून सुरू असलेल्या जोरदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीच्या कामानाही ब्रेक लागला आहे. तर भात शेती पाण्याखाली गेल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. विशेष करुन नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संततधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यात धरणांच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दारणा, कडवा धरणातून दररोज विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा: चास कमान धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणात शंभर टक्के पाणीसाठा

दारणा धरणातून आज मितीस १० हजार ५६२ क्यूसेक विसर्ग सुरू असून आज धरणात शंभर टक्के साठा संचित झाला आहे. तर कडवा प्रकल्पातुन आज ७ हजार ६३२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाचा शंभर टक्के साठा आज झाला आहे. तसेच भाम धरणातुनही ४ हजार ३७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर तालुक्यात आज अखेरपर्यंत ४ हजार ५०० मिलीमीटर पाऊस झाल्याची विक्रमी नोंद घेण्यात आली आहे.

तालुक्यात चौफेर फटकेबाजी : तालुक्यातील अति पावसाच्या त्रिंगलवाडी, बलायदुरी,आडवण टाकेघोटी ,बोरटेंभे, भावली मानवेढे, बोर्ली, नांदगावसदो, पिंपरीसदो, तळेगाव, घोटी, मुकणे, सांजेगाव, आहुर्ली, म्हसुर्ली, वैतरणा, दौंडत, आवळखेड, चिंचलेखैरे, देवळे, खैरगाव, खंबाळे, शेणीत, इंदोरे, धामणगाव, कवडदरा, गिरणारे काळूस्ते, शेनवड, मुंढेगाव, खेड, इंदोरे, माणिकखांब या भागातही पावसाची जोरदार फटकेबाजी झाली आहे.

आकडे बोलतात :

आजचा पाऊस : १२३ मिलीमीटर

एकूण पाऊस : ४ हजार ५०० मिलीमीटर

मंडळनिहाय आजचा पाऊस असा : पाऊस मिलीमीटरमध्ये : इगतपुरी : १२३,

घोटी : १०२, धारगाव : ५२, वाडीव-हे : ६३, नांदगाव बु : ५५, टाकेद : ५५

आज सुरु असलेला विसर्ग :

दारणा : १० हजार ५६२ क्यूसेक

मुकणे : १ हजार ०८९ क्युसेक

कडवा : ७ हजार ६३२ क्युसेक

भावली : ८२२ क्युसेक

भाम : ४ हजार ३७३ क्युसेक

वालदेवी : ४०७ क्युसेक

अप्पर वैतरणा : १ हजार ७४८

हेही वाचा: Climate change : महाराष्ट्रातील या किनारपट्टीचा ५५ हेक्टर भाग पाण्याखाली

तालुक्यातील धरणातील जलसाठा :

( धरण : टक्केवारी )

दारणा : १०० टक्के ,भावली : १०० टक्के

मुकणे : ९४.७१ टक्के,कडवा : १०० टक्के

वाकी : १०० टक्के,भाम : १०० टक्के

वैतरणा : १०० टक्के,वालदेवी : १०० टक्के

हेही वाचा: Beauty Tips : लिजा हेडनच्या नॅचरल ब्युटीचे टॉप सिक्रेट; वाचाल तर नक्की ट्राय कराल !

Web Title: Nashik Rain Update Stormy Rains In Igatpuri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..