esakal | नाशिक : वरुणराजाची निम्म्या जिल्ह्यात हजेरी; धरणांत ६५ टक्के जलसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

manikpunj dam.jpg

वरुणराजाची निम्म्या जिल्ह्यात हजेरी; धरणांत ६५ टक्के जलसाठा

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यावर रुसलेल्या वरुणराजाने मागील २४ तासांत निम्म्या जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मोठ्या सात आणि मध्यम १७, अशा २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के कमी म्हणजेच आतापर्यंत ६५ टक्के जलसाठा झाला आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टअखेर भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळकर, नाग्यासाक्या, माणिकपुंज अशी आठ धरणे फुल झाली होती. त्या वेळी २४ प्रकल्पांमध्ये ७८ टक्के जलसाठा झाला होता. आता आळंदी, भावली, कडवा, हरणबारी, माणिकपुंज ही पाच धरणे फुल झाली आहेत. सद्यःस्थितीत आळंदीमधून ३०, भावलीतून १३५, वालदेवीमधून ६५, हरणबारीमधून ५६ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण गेल्यावर्षी ऑगस्टअखेर ९४ टक्के भरले होते. आता त्यात ९१ टक्के साठा झाला आहे. कश्‍यपीमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा दोन टक्के अधिक म्हणजेच ६६ टक्के साठा झाला आहे. गौतमी गोदावरीमध्ये तीन टक्के कमी म्हणजेच ७३ टक्के साठा झाला आहे.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'

दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक- ९, इगतपुरी- ३३, दिंडोरी- ७, पेठ- २१.१, त्र्यंबकेश्‍वर- १८, मालेगाव- ४४, नांदगाव- ३७, चांदवड- ९, कळवण- ११, बागलाण- १८.४, सुरगाणा- ३५.१, देवळा- ०.३, निफाड- ४, सिन्नर- ०, येवला- २६. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी याप्रमाणे ः नाशिक- ४१.१३, इगतपुरी- ७७.३४, दिंडोरी- ५२.८६, पेठ- ७४.७९, त्र्यंबकेश्‍वर- ६०.०८, मालेगाव- ८२.८२, नांदगाव- ८३.४५, चांदवड- ३४.७५, कळवण- ५६.४४, बागलाण- ६८.५०, सुरगाणा- ७७.६५, देवळा- ७५.११, निफाड- ७८.४३, सिन्नर- ४६.५२, येवला- ७१.८७. जिल्ह्यात आतापर्यंत ६८.१७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यात ८६.९७ टक्के पाऊस झाला होता. पावसाची ही आकडेवारी पाहता नाशिक, चांदवड, सिन्नर तालुक्यांला आणखी पावसाची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट होते.

जोरदार पावसाची शक्यता

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मंगळवारी (ता. ३१) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यात तुरळक सरींचा अंदाज वर्तवितला आहे. बुधवारी (ता. १) नाशिक, नंदुरबारसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

loading image
go to top