Eat Right Challenge : केंद्राच्या ‘इट राइट’ चॅलेंजमध्ये नाशिक देशात 70 व्या क्रमांकावर: सकस आहाराची तपासणी

अन्नसुरक्षा व मानके व्यवस्था सुधारअंतर्गत केंद्र सरकारने आयोजन केलेल्या ‘इट राइट’ या चॅलेजिंग स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले होते.
Nashik ranked 70th in country in Central Eat Right Challenge nashik news
Nashik ranked 70th in country in Central Eat Right Challenge nashik newsesakal

Eat Right Challenge : अन्नसुरक्षा व मानके व्यवस्था सुधारअंतर्गत केंद्र सरकारने आयोजन केलेल्या ‘इट राइट’ या चॅलेजिंग स्पर्धा २०२२-२३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला असून, यात राज्यात नाशिकचा नऊ, तर देशात ७० वा क्रमांक लागला आहे.

मागील वर्षीपेक्षा या वर्षी अजून रॅकिंगमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न नाशिक विभागाचा असल्याचे अन्नसुरक्षा विभागाचे सहआयुक्त संजय नारगुडे यांनी सांगितले. (Nashik ranked 70th in country in Central Eat Right Challenge nashik news)

केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या मदतीने धार्मिक व पर्यटनस्थळ या ठिकाणी देशविदेशातील पर्यटकांना सुरक्षित अन्न मिळण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून इट राइट अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येते आहे. यात पहिल्या वर्षी १०० स्थळांचा सहभाग करण्यात आला. त्याचा प्राथमिक अहवालानंतर ही मोहीम व्यापक करण्यात आली.

२०२२-२३ मध्ये इट राइट योजनेंतर्गत देशातील सुमारे २५० शहरांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अन्न स्थापना तपासणीत आणि अन्न व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे आदी मानकांवर सरस कामगिरी केली आहे. या उपक्रमात अन्नपदार्थांचा दर्जा व त्याची गुणवत्ता, हे निकष महत्त्वाचे होते.

Nashik ranked 70th in country in Central Eat Right Challenge nashik news
Right Way To Eat Curd : दह्याचा आणि या वस्तूंचा आहे ३६ चा आकडा, एकत्र खाल तर जीवही जाईल

विविध प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मात्यांना हे निकष कसे पाळावेत, याचे मार्गदर्शन करणे, अन्नपदार्थ उत्पादनांचा दर्जा यासंदर्भातील माहिती उपलब्ध व्हावी, विविध प्रकारच्या अद्ययावत तपासण्या करण्यात आल्या. सर्वबाबी नाशिक येथील अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने अजूनही केंद्र सरकारच्या साइटवर अपलोडिंग करणेचे काम सुरू आहे.

या स्पर्धेत २०० गुण मिळून इंदूरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेसाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवली होती. यात अन्न व औषध प्रशासनाकडून परवान्यांसह नोंदणी वाढविण्यात आली आहे. ‘सही भोजन, बेहतर जीवन’, हे सूत्र घेऊन एफएसएसएआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

''यात देवी मंदिर, इस्कॉन मंदिरासह सर्व मोठे धार्मिक स्थळातील प्रसादालयाची आमच्या विभागातर्फे तपासणी करण्यात आली. नाशिक येथील रेल्वेथानकावरही तपासण्या करण्यात आल्या. शहरातील अन्न तयार करणाच्या हजाराच्या वर आस्थापनांना प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानांतर्गत हॉटेल बेकरी, तसेच स्वीटमार्ट याचीही तपासणी करण्यात आली.''- संजय नारागुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक

Nashik ranked 70th in country in Central Eat Right Challenge nashik news
Right Time To Eat Fruits: रिकाम्या पोटी कोणते फळ खाणे आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या फळे खाण्याची योग्य वेळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com