पोर्टलमार्फत शिक्षक भरतीवर फेरविचार | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक भरतीवर फेरविचार

नाशिक : पोर्टलमार्फत शिक्षक भरतीवर फेरविचार

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : पोर्टलमार्फत शिक्षक भरती फेरविचार संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे पदाधिकारी व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांची ऑनलाइन व ऑफलाइन बैठक गुरुवारी (ता.११) दुपारी दोनला होणार आहे. यात राज्यातील टीईटी अर्थातच टीचर एन्ट्रन्स टेस्ट पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची परवानगी द्यावी का, या संदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संस्थाचालकांसह शिक्षक होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे गुरुवारच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

भारतातील काही राज्यांमध्ये संगणकीय स्पर्धा परीक्षेत तीन ते पाच वर्षांपासून सातत्याने होणारे घोटाळे व गुणांमधील फेरबदल याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. हरियाना शिक्षक भरती, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातील परीक्षांबाबत संशयास्पद वातावरण केंद्रीय पातळीवरील जी-मेट (MAT) परीक्षेत सायबर घोटाळा या अनेक गोष्टी घडल्या आहेत. भविष्यात पोर्टल पद्धतीत पारदर्शकता राहील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने टीईटीची सक्ती केली आहे. शिक्षक भरती करताना केंद्र सरकारची परीक्षा ग्राह्य धरायची की राज्य सरकारचे पवित्र पोर्टल किंवा मार्क ग्राह्य धरायचे, याबाबत काही राज्यांत वाद निर्माण झाले होते व हे प्रकरण कोर्टात गेले. त्यात सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या परीक्षेला प्राधान्य राहील, असा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे याच विषयावर गुरुवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सर्व पदाधिकारी व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होऊन फेरविचार केला जाणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.

हेही वाचा: मुंबई : औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव

मागण्यांना सरकारचा हिरवा कंदील

गेल्या महिन्यात शासनाबरोबर झालेल्या बैठकीत संस्थाचालकांनी केलेल्या मागणीनुसार आणि खासदार शरद पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने अनुदानाची वाट बघत बसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना २० टक्के अनुदान घोषित केले आहे. वेतनेतर अनुदान द्यायला सुरवात करायची म्हणून ५१ कोटी रक्कम तातडीने तरतूद करण्याची घोषणा केली आहे. महाविद्यालयांमध्ये थांबलेली प्राध्यापक भरती पुन्हा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील मिळाला असून, राज्यात दोन हजार २०५ प्राध्यापकांच्या भरतीला मंजुरी मिळाली आहे. म्हणून या बैठकीकडे राज्याच्या शिक्षण विभागातील सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांसमवेत बैठक

गेल्या महिन्यात शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, कोंडाजी आव्हाड, शिक्षक आमदार किरण सरनाईक व इतर संस्थाचालकांबरोबर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, फौजिया खान व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत पोर्टलसंदर्भात मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाली. त्या ठिकाणी अनेक मुद्द्यांमध्ये पोर्टल भरतीचा मुद्दा वादग्रस्त ठरला त्याचीच परिणती म्हणून ही बैठक होणार आहे.

loading image
go to top