Nashik Anganwadi Recruitment : अंगणवाडी मदतनीसांच्या जिल्ह्यात 501 जागा भरणार

Anganwadi Recruitment : तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
Nashik Anganwadi Recruitment
Nashik Anganwadi Recruitment esakal

Nashik Anganwadi Recruitment : जिल्ह्यातील ५०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले. (Nashik Recruitment for Anganwadi helper marathi news)

जिल्हयातील बालविकास प्रकल्प अधिकारींची बैठक गुरूवारी (ता.२९) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीमध्ये ‘लेक लाडकी’ या योजनेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण श्रीमती मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले. (latest Marathi News)

Nashik Anganwadi Recruitment
Anganwadi Recruitment: अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांची भरती! पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हयातील ५०१ अंगणवाडी मदतनीसांची अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यामुळे जिल्हयात ५०१ अंगणवाडी मदतनीसांची पदे नव्याने निर्माण झाली आहेत.

प्रकल्पस्तरावर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना देखील श्रीमती मित्तल यांनी दिल्या. महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

Nashik Anganwadi Recruitment
Anganwadi Recruitment : अकोला ग्रामीणसाठी अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com