esakal | 'गोदावरी एक्स्प्रेस’ सुरू करा; प्रवासी लिहिणार प्रशासनास पत्र, आंदोलनाचीही तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

godavari express

'गोदावरी एक्स्प्रेस’ सुरू होण्याची नाशिककरांना आशा

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड- मनमाड- नाशिककरांची कौटुंबिक गाडी असणारी ‘गोदावरी एक्स्प्रेस’ बंद करण्याचा घाट घातला जातो आहे. २२ मार्च २०२० पासून गोदावरी बंद आहे. ही गाडी सुरू करावी, अशी मागणी नाशिककर करीत असून, महिनाभरात ही गाडी सुरू केली नाही, तर सामान्य नाशिककरांसह प्रवासी संघटना नाशिक रोड, मनमाड रेल्वेस्थानकावर आंदोलन करणार असल्याचे नाशिककरांनी सांगितले आहे. यासंदर्भात नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते रेल्वे बोर्डाला लेखी पत्र लिहून गोदावरी सुरू करण्याची मागणी करणार आहेत.

प्रवासी लिहिणार रेल्वे बोर्ड प्रशासनास पत्र; आंदोलनाचीही तयारी

नाशिककरांची प्रवास वाहिनी असणारी ‘गोदावरी एक्स्प्रेस’ ही गेल्या अनेक वर्षांची प्रवाशांची लाइफलाइन आहे. कारण नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी हक्काच्या तीन गाड्या आहेत. यात राज्यराणी सकाळी सहाला, पंचवटी सव्वासातला, तर गोदावरी सव्वानऊला नाशिक रोडला येते. या तिन्ही रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद खूप कमी झाल्याचे कारण देत मनमाड-एलटीटीई गोदावरी ही नाशिकची फॅमिली रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातल्याचा आरोप नाशिककरांनी केला आहे. कोविडचे कारण दाखवून ही गाडी २२ मार्च २०२० ला बंद करण्यात आली ती आजपर्यंत सुरू झाली नाही. या गाडीद्वारे दररोज सुमारे सातशे ते आठशे प्रवासी दिवसाला मुंबईला जात होते. व्यावसायिक महिला आणि विद्यार्थ्यांना ही गाडी परवडणारी होती म्हणून आमची हक्काची गाडी गोदावरी एक्स्प्रेस लवकर सुरू करावी, यासाठी नाशिककर रेल्वे बोर्डाला लेखी पत्र लिहिणार असल्याचे नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

नाशिकरांच्या हक्काच्या गाड्या पळविल्या जात आहेत म्हणून मुंबईला जाणारी गोदावरी लवकरात लवकर सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. गोदावरी महिनाभरात सुरू न झाल्यास प्रवासी संघटनांसह नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते मनमाड व नाशिक रोड रेल्वेस्थानकावर आंदोलन करतील.-सचिन अहिरे

गोदावरी ट्रेन सुरू करावी म्हणून आम्ही रेल्वे खात्याची लेखी पत्रव्यवहार करणार आहोत. ही गाडी कोरोनामुळे बंद करण्यात आली. मात्र पंचवटी सुरू केली तशीच ही गाडी सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. -अभिजित गोसावी

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

हेही वाचा: वय नसले तरी लग्न लावून द्या! अल्पवयीन मुला-मुलीची लगीनघाई

loading image