Nashik | उन्‍हाचा पुन्‍हा वाढला चटका..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik residents tired of brunt of the heat due to rising temperature Nashik News

Nashik | उन्‍हाचा पुन्‍हा वाढला चटका..!

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्‍हाची तीव्रता कमी झाली होती. अशात सोमवारी (ता. २५) पुन्‍हा एकदा उन्‍हाचा चटका नाशिककरांना सहन करावा लागला. दिवसभर तीव्र सूर्य किरणांपासून बचाव करताना नाशिककरांची दमछाक झाली. उष्णतेच्‍या लाटेची (Heat waves) शक्‍यता वर्तविलेली असताना आगामी काही दिवस अशाच स्वरूपात उन्‍हाचा तडाखा कायम राहाण्याची शक्‍यता आहे.

सध्या नाशिकचे सरासरी किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. एप्रिल महिना संपत असताना आत्तापासून उन्‍हाची तीव्रता जाणवते आहे. सोमवारी कडक ऊन पडल्‍याने दिवसाच्‍या वेळी जनजीवन प्रभावित झाले होते. शहरातील प्रमुख बाजारपेठा व रस्‍त्‍यावर वर्दळ घटली होती. कामानिमित्त बाहेर असलेल्‍या नागरिकांकडून उपरणे, टोपी, रुमाल आदीच्‍या माध्यमातून सूर्य किरणांपासून बचाव केला जात होता. उष्णतेच्या लाटेच्‍या पार्श्वभूमीवर येत्‍या काही दिवसांत पाऱ्यात आणखी वाढ होऊन उन्‍हाळ्याची तीव्रता वाढण्याची शक्‍यता जाणकारांनी व्‍यक्‍त केली आहे.

हेही वाचा: मालेगावच्या बाजारात कैरी दाखल; रमजानमुळे भाजीपाल्याच्या मागणीत घट

आरोग्‍य सांभाळण्याची आवश्‍यकता
उन्‍हाची तीव्रता वाढत असताना आरोग्‍य सांभाळणे आवश्‍यक झाले आहे. अशात आवश्‍यकता नसताना उन्‍हात फिरणे टाळावे. कामानिमित्त बाहेर पडताना सर्व प्रतिबंधात्‍मक उपाय करावेत. तसेच, दिवसभरात सुमारे पाच ते सात लिटर पाणी प्‍यावे. शरीरासाठी पौष्टिक ठरेल अशा घटकांचा आहारात समावेश करावा, असा सल्‍ला तज्‍ज्ञांनी दिला आहे.

हेही वाचा: सिटी लिंकतर्फे आजपासून महिलांसाठी स्वतंत्र बससेवा | Nashik

Web Title: Nashik Residents Tired Of Brunt Of The Heat Due To Rising Temperature Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksummerTemperature
go to top