Nashik News : 20 वर्षांपासून नवीन नाट्यगृहाची मागणी प्रलंबित; नाशिक रोड नाट्यगृहाकडे नजरा

Nashik : कलावंत व रसिकांची गेल्या वीस वर्षांपासूनची नवीन नाट्यगृहाची मागणी प्रलंबित आहे. महापालिकेने नाशिक रोडला ७२० खुर्च्यांचे आधुनिक असे नाट्यगृह मंजूर केले आहे.
drama
dramaesakal

Nashik News : येथील नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवण्याची वाट कलावंत, रसिक, साहित्यिक पाहत आहे. कलावंत व रसिकांची गेल्या वीस वर्षांपासूनची नवीन नाट्यगृहाची मागणी प्रलंबित आहे. महापालिकेने नाशिक रोडला ७२० खुर्च्यांचे आधुनिक असे नाट्यगृह मंजूर केले आहे. परंतु, त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. शिवाय अनेक वर्षांपासून बंद पडलेला टाऊन हॉल अखेरची घटका मोजत आहे. (nashik Road theater marathi news )

विभागीय महसूल कार्यालयाजवळ अनेक दिवसांपासून काम सुरू असणारे नाट्यगृह अजूनही रसिकांच्या सेवेला उतरले नाही. राजकीय, सामाजिक श्रेयवादाची लढाई आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा रंगकर्मींचा आरोप आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाशिक शाखाध्यक्षा रवींद्र कदम आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दादा भुसे तसेच नाट्य परिषदेचे मुख्य अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले यांना पत्र लिहून नाशिक रोडचे नाट्यगृह त्वरित उभारण्याची मागणी केली होती.

आजपर्यंत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला, मात्र नाट्यगृहाची मुहूर्तमेढ रोवली गेली नाही. बिटको चौकाजवळील मोठ्या भूखंडावर कोठारी नाट्यगृह होणार आहे. सुरवातीला त्याची क्षमता ४२० एवढीच होती. परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ही क्षमता ७२० झाली आहे. नाशिक रोडला हक्काचे नाट्यगृह नसल्याने नाशिकमधील दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कलामंदिराची वाट धरावी लागते. तेथे जाण्यासाठी वेळ, पैसा, श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होतात.

drama
Nashik News : ओझरला 27 नळकनेक्शन खंडित! नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; करवसुली मोहीम जोरात

फक्त हवा पाठपुरावा

नाशिक रोडची लोकसंख्या वाढली आहे. देवळालीगाव येथे महापालिकेचे दोनशे खुर्च्यांचे महात्मा गांधी सभागृह आहे. मात्र, ते अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. सांस्कृतिक कार्यासाठी वाहून घेतलेल्या ऋतुरंग भवनावर तांत्रिक मर्यादा आहेत. नवीन नाट्यगृहासाठी केंद्र शासनाचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गतचा पाच कोटीचा निधी महापालिकेला मिळाला आहे. नाट्यगृह मंजूर झाले, त्या वेळी या कामाचे टेंडर १८ कोटींचे होते.

ते आता नवीन डीएसआर दराने ३५ कोटी झाले आहे. काम जितके लेट होईल तितके बजेट वाढत जाईल. पर्यायाने शासनाच्या तिजोरीतून अतिरिक्त पैसा खर्च होईल. हे काम होण्यासाठी शासनाचा पन्नास टक्के म्हणजे १५-२० कोटीचा निधी महापालिकेला मिळणे अपेक्षित आहेत. ते मिळाल्यास नाट्यगृहाचे काम सुरू होईल. तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रयत्नाने हे नाट्यगृह मंजूर झाले. आता आमदार राहुल ढिकले यांनी जोमाने प्रयत्न सुरु करावे, अशी नाट्यकर्मींची अपेक्षा आहे.

''नाशिक रोडला अद्ययावत नाट्यगृह त्वरित उभारणे काळाची गरज आहे. पाच वर्षे झाले, तरी लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे नाट्यगृह साकारलेले नाही. केंद्राचाही निधी आला आहे. प्रशासनाने एकजुटीने युद्धपातळीवर प्रयत्न करून नाट्यगृह उभारावे.''- सुनील ढगे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय नाट्य परिषद, नाशिक शाखा

''सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नाट्यगृह होऊ शकले नाही. नगरसेवक असताना अनेक वेळा निवेदने दिली, पाठपुरावा केला. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. इतर विकासकामे झपाट्याने झाली मात्र कला रसिकांची भूक भागवण्यासाठी नाट्यगृहाची मुहूर्तमेढ सत्ताधाऱ्यांना रोवता आली नाही.''- डॉ. सीमा ताजणे, माजी नगरसेविका

''उत्तर महाराष्ट्राची मुख्य प्रशासकीय केंद्रे या ठिकाणी आहेत. मात्र नाट्यगृह नाही. रसिकांना शहरात जाऊन आपली कलेची भूक भागवावी लागते. नाशिक रोडला नाट्यगृह उभे राहिल्यास नवकलावंतांना संजीवनी मिळून कीर्तीवंत आणि ज्ञानवंत कलाकार घडतील याची खात्री वाटते. प्रशासनाने प्राधान्याने नाट्यगृहाची कुदळ मारावी.''- मंगेश जोशी, निवेदक

drama
Nashik News : ओझरला 27 नळकनेक्शन खंडित! नगरपरिषदेची थकबाकीदारांवर कारवाई; करवसुली मोहीम जोरात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com