Sanap- Bhujbal Meeting: सानप- भुजबळ भेटीने भाजपमध्ये नाराजी; उमेदवारी जाहीर नसताना प्रोटोकॉल मोडल्याचे वरिष्ठांच्या कानावर

Sanap- Bhujbal Meeting: नाशिकमधील उमेदवार म्हणून नाव चर्चेत आलेले छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
While leaving the residence of Minister Chhagan Bhujbal, Balasaheb Sanp.
While leaving the residence of Minister Chhagan Bhujbal, Balasaheb Sanp.esakal

Sanap- Bhujbal Meeting : भारतीय जनता पक्षाचे दिंडोरी लोकसभा समन्वयक आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि नाशिकमधील उमेदवार म्हणून नाव चर्चेत आलेले छगन भुजबळ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. श्री. भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झालेली नसताना सानप यांनी महायुतीचा प्रोटोकॉल मोडून भेट घेतल्याने ही नाराजी वरिष्ठांकडे कळविण्यात आली आहे. (nashik Sanap Bhujbal meeting upset in BJP group marathi news)

पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले सानप यांचा २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत उमेदवारी मिळविली; परंतु मतदारांनी भाजपचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने सानप यांना माजी आमदार व्हावे लागले. त्यानंतर सानप यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला; परंतु त्यांच्याकडे मुख्य अशी जबाबदारी नव्हती.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानप यांना नाशिकऐवजी पक्षाच्या वरिष्ठांकडून दिंडोरी लोकसभेची समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व मनसेकडून उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू आहे. त्यात नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार असल्याने त्यातही अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाल्याने राजकीय गणिते बदलली.

अद्याप भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. असे असताना सानप यांनी दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची यांच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल दीड ते दोन तास चर्चा केली. पक्षाच्या कुठल्याही नेत्याला यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे सानप यांनी भुजबळ यांची भेट का घेतली, याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठांकडे नाराजी व्यक्त केली.  (latest marathi news)

While leaving the residence of Minister Chhagan Bhujbal, Balasaheb Sanp.
Chhagan Bhujbal : कौशल्याधिष्ठित शिक्षणासाठी संस्थांनी काम करावे : मंत्री छगन भुजबळ

प्रोटोकॉल सर्वांनाच समान

शिवसेनेच्या शिंदे गटाच्या संवाद मेळाव्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत तत्काळ वरिष्ठांकडे तक्रार केली. महायुतीकडून अद्याप नाशिकच्या जागेचा कुठलाही निर्णय झाला नसताना शिंदे यांनी घेतलेली भूमिका अयोग्य असल्याचे मत मांडण्यात आले.

नाशिक जागेसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून भुजबळ यांची निवासस्थानी भेट घेण्यात आल्याने ही बाबही महायुतीच्या प्रोटोकॉलला धरून नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

''महानुभाव पंथाच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.''- बाळासाहेब सानप, माजी आमदार

While leaving the residence of Minister Chhagan Bhujbal, Balasaheb Sanp.
Chhagan Bhujbal : महायुतीच्या बैठकीत माझ्या नावाची चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com