भाषा संवाद : आवाज - भाषा संवादाचे एकमेव प्रभावी माध्यम

Language Communication : शारीरिक आवाज यंत्रणा (आर्टिक्यूलेशन), श्वास आणि आवाजातील चढ-उतार हा या अभ्यासातील पहिला टप्पा आहे.
language communication
language communicationesakal

लेखिका : तृप्ती चावरे-तिजारे

‘भाषा संवाद’ या सदरातील मागील भागात आपण पाहिले, की भाषा कितीही तयार केली, तरीही बोलणे ही एक वेगळीच कला आहे. भाषा (Language Communication) कितीही चांगली तयार केली; पण ती बोलण्यासाठी आवाजावरच मेहनत घेतली नाही तर त्या भाषेचा डौल जातो.

उत्तम भाषा आणि घडलेल्या आवाजात बोलता येण्यासाठी आवाजाचे संतुलन कसे राखायचे, ते आपण अभ्यासत आहोत. शारीरिक आवाज यंत्रणा (आर्टिक्यूलेशन), श्वास आणि आवाजातील चढ-उतार हा या अभ्यासातील पहिला टप्पा आहे. (nashik saptarang latest article on language communication marathi news)

बोलणे ही एक कला आहे. अनेकांच्या मनात सुंदर मराठी भाषा तयार असते; परंतु ती प्रवाही संवादाच्या दालनापर्यंत पोहोचू शकत नाही. याचे कारण म्हणजे अशा लोकांनी भाषेवर बरीच मेहनत केलेली असते; परंतु ती व्यक्त ज्यातून होते, अशा आवाजाची कला अवगत केलेली नसते.

मनातील विचार, भावना आणि भाषा कितीही सुंदर असली, तरी ते जोवर स्वतःच्याच बोलण्यातून ‘व्यक्त’ होत नाहीत, तोवर त्याला भाषा म्हणता येणार नाही. या अडचणीचा विचार करून, भाषा संवादाच्या या प्रवासात आवाजाच्या वळणावरचा शास्त्रशुद्ध निर्मितीविचार केला पाहिजे.

भाषा व्यक्त करणाचे एकमेव माध्यम म्हणजे आवाज. भाषेप्रमाणेच आवाजालाही संतुलन असते. ते अभ्यासासाठी आवाजातील शुद्धता, स्पष्टता आणि सौंदर्य ही कौशल्ये विकसित करणारा एक त्रिकोण आता पाहू या. सहज, सोपी आणि सुंदर भाषा बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी, शरीर, श्वास आणि भावनांचे संतुलन साधून देणारा हा त्रिकोण आहे.

प्रभावी आणि प्रवाही भाषा बोलण्यासाठीचा हा जणू नकाशाच आहे. संतुलन त्रिकोणातील या तिन्ही कोनांचा तोल कुणाला कसा सांभाळता येतो, यावर त्या-त्या व्यक्तीच्या बोलण्याचा प्रवाह आणि प्रभाव ठरत असतो. (Latest Marathi News)

language communication
भाषा व्यक्तिमत्त्वाचा पाया
आवाजाचा संतुलन त्रिकोण
आवाजाचा संतुलन त्रिकोणesakal

उत्तम वक्ते, अभिनेते, विचारवंत किंवा कलाकार यांचे भाषासौंदर्य हे केवळ मनाच्या पातळीवर अव्यक्त रूपात लपून न राहता, ते वरील त्रिकोणाच्या आधारे, प्रत्यक्ष बोलण्यातून तोलून मापून व्यक्त होत असते. म्हणूनच त्यांची भाषा ‘घडविलेली’ वाटते. भाषा ही सोन्यासारखी असते;

पण त्या सोन्यापासून अलंकार मात्र भाषिकाला स्वतःलाच घडवावे लागतात. आवाज घडविणे हा त्या घडणावळीतला पहिला संस्कार. या संस्काराचे तीन पैलू म्हणजे शरीर, श्वास आणि भावना. त्यापैकी सर्वप्रथम आवाजाचे शरीर आणि शरीरातून निघणारा आवाज याविषयी विचार करू या.

आवाजाचे शरीर म्हणजे भाषेची रचना आणि मांडणी, तर शरीरातून निघणारा आवाज ही नाण्याची दुसरी बाजू आहे. बोलताना जबडा, जीभ, फुफ्फुसे, नाक, तोंड, गळा, मानेचा कणा आणि मुखविवरातील विविध पोकळ्या यासारख्या आवाजनिर्मिती करणाऱ्या शारीरिक अवयवांचा वापर योग्य रीतीने व पुरेशा क्षमतेनिशी कसा केला पाहिजे, याला आवाजाचा शारीरिक अभ्यास असे म्हणतात.

हा अभ्यास केला नाही तर भाषा उच्चारांशी निगडित शारीरिक क्षमता विकसित होत नाहीत. याचा परिणाम म्हणजे उच्चारात बिघाड निर्माण होऊन अस्पष्टता येते. बोबडे बोलणाऱ्या व्यक्तींसाठी जी स्पीच थेरपी दिली जाते, तिच्यात उच्चारांच्या निर्मितीत सहभागी होणाऱ्या स्वरस्थानांना बळकटी यावी म्हणून उच्चार स्पष्ट करणारे मुखाचे व्यायाम करवून घेतले जातात.

आजचे प्रगत विज्ञान असे म्हणते, की उच्चार ही एक शरीरनिर्मित गोष्ट आहे. प्रगत देशांमधून ‘भाषा उच्चार शास्त्र’ [Articulation/ Linguistic phonation training] ही स्वतंत्र विद्याशाखा म्हणून अस्तित्वात आहे. या शाखेतून, भाषेच्या उच्चारात शरीराचे संतुलन किती आणि कसे महत्त्वाचे काम करते, यावर संशोधनात्मक व प्रयोगात्मक कार्य केले जाते. (Latest Marathi News)

language communication
भाषा-संवाद: ऐकण्याची भाषा : मेहनतीने कमवा, सरावाने घडवा...

भारतीय शिक्षणप्रणालीत मात्र जिथे मातृभाषाच वादाच्या भोवऱ्यात सापडते, तिथे उच्चार शास्त्राविषयी कोण आणि कसा विचार करणार असा प्रश्न आहे. भाषेतील स्वर आणि व्यंजनांचा उच्चार ही शरीरजन्य बाब आहे. त्यावर जाणीवपूर्वक काम झाले पाहिजे, हे आता तरी लक्षात घेतले पाहिजे. कारण व्यक्तीच्या आचार आणि विचार घडण्याच्या प्रक्रियेत, उच्चारालाही तितकेच महत्त्व आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

भाषा उच्चारशास्त्राचे शिक्षण शाळेतून किंवा अभ्यासक्रमातून मिळण्याची सोय आज उपलब्ध नसली, तरीही यावर संशोधनात्मक काम करणाऱ्या व प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था हल्ली आकार घेऊ पाहत आहेत. नाशिकमधूनही अंतर्नाद या संस्थेमार्फत आवाज आणि भाषा विकासविषयक कौशल्ये विकसित करणारे ‘सुंदर माझी मराठी’सारखे प्रयोग व उपक्रम राबविले जातात.

या उपक्रमात सहज सुंदर मराठी बोलायला शिकविणारे चार प्रकारचे वर्ग तयार केले असून, त्यातून शब्द, उच्चार, छंद, काव्य, मराठी श्लोक, ओवी, अभंग, उतारा, नाट्य आदी अभिवाचनात्मक पैलूंची तयारी करून घेतली जाते. कविता वाचनातील प्रवाह समजून घेऊन ती मोठ्याने म्हणणे हा एक आनंददायी अभ्यासाचा भाग आहे;

पण आजकाल पुस्तकातील कविता पुस्तकातच राहतात. त्या डोक्यात शिरत नाहीत, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासातला हा आनंद कुठेतरी थांबला आहे. हा आनंद पुन्हा प्रवाही करण्यासाठी आपल्याला येत असलेली भाषा चांगल्या आवाजात व्यक्त करण्याचा स्वतंत्र अभ्यास, शाळा-शाळांमधून आणि घराघरांमधून सुरू केला पाहिजे.

भाषासंवादात आवाजनिर्मिती हा एक क्रियायोग आहे. शरीर हे त्याचे माध्यम आहे. आवाजनिर्मितीत सहभागी असणाऱ्या शरीररचना आणि तिचे कार्य याविषयी अधिक जाणून घेणार आहोत, भाषा संवादच्या पुढील भागात.

(क्रमशः) 

language communication
भाषा संवाद : भाषा प्रयोग आणि आवाजाचे संतुलन...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com