Saptashrungi Devi Chaitrotsav : यंदा प्रथमच माता की चौकी, हरिनाम सप्ताह; 16 पासून चैत्रोत्सवाची धूम

Chaitrotsav : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरूपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवास चैत्र शुद्ध ८ अर्थात १६ एप्रिलपासून सुरवात होत आहे.
Various religious programs during Adimaye Chaitrotsav
Various religious programs during Adimaye Chaitrotsavesakal

Saptashrungi Devi Chaitrotsav : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरूपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवास चैत्र शुद्ध ८ अर्थात १६ एप्रिलपासून सुरवात होत आहे. चैत्रोत्सवाच्या काळात प्रतिवर्षाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच प्रथमच चैत्रोत्सवात विशेष धार्मिक कार्यक्रम म्हणून देवी भागवत अखंड हरिनाम सप्ताह व जगराता (माता की चौकी) कार्यक्रम होईल. (nashik Saptashrungi Devi Chaitrotsav Mata Ki Chowki and Harinam week marathi news)

खानदेशाची माहेरवाशीण व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवीचा चैत्रोत्सव चैत्र शुद्ध ८ दुर्गाष्टमीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत असतो. यंदा यात्रेची समाप्ती २३ एप्रिलला होईल. यात्रेसाठी खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह ‘कसमादे’ भागातील लाखो भाविक पंरपरेने दरवर्षी पायी गडावर येतात. चार ते आठ दिवसांचा प्रवास करीत हे भाविक पौर्णिमेपर्यंत गडावर दाखल होतात. चैत्रोत्सव कालावधीत श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, तसेच विविध धर्मिक संस्थांतर्फे कार्यक्रम होतील.

याच कालावधीत विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना अन्नदानासह सेवा देण्यासाठी सज्ज होत आहेत. चैत्र शुद्ध ८ दुर्गाष्टमी, १६ एप्रिलला सकाळी सातला पंचामृत महापूजा, साडेनऊला नवचंडी याग, होमहवन, दुपारी चारला पालखी मिरवणूक व नगर प्रदक्षिणा, चैत्र शुद्ध ९ अर्थात रामनवमीला श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सातला होईल.

दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. चैत्रोत्सवात दररोज सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. चैत्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या सोमवारी (ता. २२) सकाळी सातला पंचामृत महापूजा, दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात ध्वजपूजन होईल.  (latest marathi news)

Various religious programs during Adimaye Chaitrotsav
Saptashrungi Devi Gad: दसऱ्यास शतचंडी यागास पूर्णाहुतीने सांगता; मोजक्याच मानकरींच्या उपस्थितीत बोकडबळी

यानंतर ध्वज मानकरी दरेगावचे गवळी-पाटील कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाईल. याच दिवशी गवळी-पाटील रात्री बाराला श्री भगवती शिखरावर कीर्तिध्वजाचे ध्वजारोहण करतील. मंगळवारी (ता. २३) सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. उत्तर रात्री ५.१८ ला चैत्र पौर्णिमा समाप्ती होईल.

चैत्रोत्सवात प्रथमच विशेष धार्मिक कार्यक्रम

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व गोदामृत सामाजिक-सेवाभावी संस्था, नाशिक अंतर्गत सेवाभावी वारकरी परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (ता. १७)पासून मंगळवार (ता. २३)पर्यंत देवी भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह, तसेच जगराता (माता की चौकी) कार्यक्रम होईल.

गडावरील शिवालय तलावाजवळील रिंग रोड मैदानावरील या कार्यक्रमात देवी भागवत कथेचे दररोज दुपारी दोन ते सायंकाळी पाचदरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्त कांचनताई जगताप निरूपण करतील. रात्री साडेआठ ते साडेदहापर्यंत राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन, तर रात्री अकराला नामवंत शाहिरांचा जगराता कार्यक्रम होईल. सप्ताहकाळात दररोज पहाटे पाच ते सहादरम्यान काकडा, सकाळी सहा ते सात शिवपूजन व रूद्राभिषेक आणि सायंकाळी सहा ते सातपर्यंत हरिपाठ असे कार्यक्रम होतील.

Various religious programs during Adimaye Chaitrotsav
Saptashrungi Devi Chaitrotsav : गवळी कुटुंबीय जोपासताहेत कीर्तिध्वजाची परंपरा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com