Shetkari Sahitya Sammelan : सह्याद्री फार्म्सवर आजपासून शेतकरी साहित्य संमेलन; अभिनेते नाना पाटेकर करणार उद्घाटन

Shetkari Sahitya Sammelan : शेतीअर्थ प्रबोधिनीद्वारे आयोजित अकराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला सोमवार (ता.४) पासून युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सह्याद्री फॉर्म्स मोहाडी (दिंडोरी) येथे होत आहे.
Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan esakal

Shetkari Sahitya Sammelan : शेतीअर्थ प्रबोधिनीद्वारे आयोजित अकराव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाला सोमवार (ता.४) पासून युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सह्याद्री फॉर्म्स मोहाडी (दिंडोरी) येथे होत आहे. सोमवारी (ता.४) सकाळी दहाला संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्याहस्ते होईल. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे, ज्येष्ठ साहित्यिक पुष्पराज गावंडे, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप, रामचंद्र बापू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (nashik Shetkari Sahitya Sammelan at Sahyadri Farms from today for 2 days marathi news)

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. चे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्ष असतील. कार्याध्यक्ष म्हणून गंगाधर मुटे यांची तर संयोजक म्हणून मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या आयोजनाकरिता विविध समित्यांचे गठण करण्यात आले आहे.

शरद जोशी शेतकरी पुरस्कार

शेतीतील दारिद्र्य, गरिबी आणि लाचारी संपावी म्हणून शेतकरी आंदोलनाच्या महायज्ञात स्वतःला झोकून देत शेतीच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात तनमनधनाने सामील होऊन रस्ता रोको, रेलरोको, गावबंदीसारखे अस्त्र उगारून व्यवस्थेला सळो की पळो करून प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या खात तुरुंगवास पत्करून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा.

यासाठी घटनेच्या परिशिष्ट ९ या कलमाचे जाहीर दहन करून स्वतःवर राष्ट्रद्रोहाचे कलम लावत शेतीच्या लढाईचा आवाज बुलंद केल्याबद्दल दिवंगत कडूअप्पा पाटील (गणेश दिनकर पाटील) किनगाव, यावल (जि. जळगाव) यांना युगात्मा शरद जोशी योद्धा शेतकरी (मरणोपरान्त) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संमेलनाध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार असून त्यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार आहेत. (latest marathi news)

Shetkari Sahitya Sammelan
11th Shetkari Sahitya Sammelan: नाशिकमध्ये अकरावे शेतकरी साहित्य संमेलन! ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे संमेलनाध्यक्ष

सारस्वतांची कृषी उद्योगजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले.

साहित्य संमलेनाची रुपरेषा

सोमवार, (ता.४) ः ग्रंथ दिंडी : सकाळी ७ ते ८:३०, उद्घाटन : सकाळी १० ते १, सत्र २ : परिसंवाद १ : शेतीवरील सुलतानी संकट आणि साहित्यिकांचा दृष्टिकोन : दु. २ ते ३, सत्र ३ : शेतकरी कवी संमेलन १ : दु. ३:३० ते ५:००, सत्र ४ : आदिनाथ चव्हाण यांची प्रकट मुलाखत : सायं. ५ ते ५:३०, सत्र ५ : सह्याद्री फॉर्म्स दर्शनफेरी : सायं. ५:३० ते ७:००, सत्र ६ : शेतकरी गीत-संगीत रजनी : सायं. ७ ते ९

मंगळवार, ५ मार्च ः सत्र ७ : शेतकरी कवी संमेलन २ : सकाळी ९ ते १०:३०, सत्र ८ : विलास शिंदे यांची प्रकट मुलाखत : सकाळी १०:३० ते ११
सत्र ९ : परिसंवाद : भारताकडून इंडियाकडे : सकाळी ११ ते १२:३०, सत्र १० : शेतकरी गझल मुशायरा : दुपारी १२:३० ते १:३०, सत्र ११ : कथाकथन : दुपारी २:१५ ते ३:३०, सत्र १२ : ऑनलाइन लेखन स्पर्धा २०२३ पारितोषिक वितरण : दुपारी ३:३० ते ४, सत्र १३ : समारोप सत्र : दुपारी ४ ते ४:३०.

Shetkari Sahitya Sammelan
Shetkari Sahitya Sammelan : नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन; नाना पाटेकर उद्‍घाटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com