Nashik Solar Project: सौरऊर्जा प्रकल्पातून जिल्ह्याला झळाळी! जिल्हा नियोजन समितीतून 6 कोटींना मंजुरी; मालेगाव शहरात बसणार CCTV

Nashik News : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मालेगावला जिल्ह्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
Solar Project
Solar Projectesakal

Nashik Solar Project : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मालेगावला जिल्ह्यातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आचारसंहितेपूर्वीच या प्रकल्पास सहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर मालेगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी अडीच कोटी तर जिल्ह्यातील ९२ शाळांना सौर ऊर्जा यंत्र बसवण्यात येणार असल्याने त्यांची विजेच्या बिलापासून सुटका झाली आहे. (Nashik Solar Project Solar power project in district 6 crore approved by District Planning Committee marathi news)

जिल्हा नियोजन समितीला (सर्वसाधारण) क्षेत्रासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६८० कोटी रुपये मिळाले. आदिवासी विकास विभागाला ३१३ कोटी, समाज कल्याण विभागाला १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हा नियोजनाचा शंभर टक्के निधी खर्च झाला असून, सर्व देयके अदा झाले आहेत.

जिल्हा नियोजनच्यादृष्टीने नावीन्यपूर्ण उपक्रमांना फार महत्त्व असते. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने ‘सुपर ५०’ हा उपक्रम राबवला. ग्रामीण व आदिवासी भागातील गरिबांच्या मुलांना अकरावी व बारावीचे मोफत शिक्षण देण्याची ही योजना आहे. या योजनेची व्याप्ती वाढवून ‘सुपर १००’ करण्यात आली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम एकच वर्ष राबवला जातो. त्यामुळे या योजनेतून यंदा रत्नागिरीच्या धर्तीवर मालेगावला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत.  (latest marathi news)

Solar Project
Loksabha election 2024 : दुसऱ्या टप्प्यामध्ये किती मतदारसंघ अन् किती उमेदवार; जाणून घ्या सर्व डिटेल्स...

संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या मालेगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी पोलिस अधीक्षकांनी केली होती. त्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाल्याचे समजते. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या ९२ शाळांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या शाळांची विजबिलापासून सुटका होण्यास मदत मिळाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे वीजबिल ‘शून्य’

दोन ते अडीच वर्षापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजही जिल्हाधिकारी कार्यालयासह नियोजन भवनाला संपूर्ण वीज या प्रकल्पातून पुरवली जाते. दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे वीजबिल शून्य झाल्याने कोट्यवधीचा महसूल वाचविण्यास मदत झाली आहे.

Solar Project
Saptashrungi Devi Chaitrotsava : सप्तश्रृंग गडावर आदिमायेच्या चैत्रोत्सवाचे वेध; गडावर 10 लाख भाविकांच्या हजेरीचा अंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com