INDIA against EVM morcha at nashik
INDIA against EVM morcha at nashikesakal

Nashik News: जिल्हाधिकारी कार्यालयावर EVMविरोधात धडक मोर्चा! मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी

Nashik News : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान हे मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट इव्हीएम महामार्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान हे मतपत्रिकेद्वारे घेण्याच्या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट इव्हीएम महामार्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. भारत मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात शहरातील संविधानप्रेमी संघटना सहभागी झाल्या होत्या. (Nashik Strike march INDIA against EVM marathi news)

इंडिया अगेन्स्ट इव्हीएम मोर्चाला गुरुवारी (ता. २९) दुपारी १२ वाजता गोल्फ क्लब मैदानावरून प्रारंभ झाला. या मोर्चाचे भारत मुक्ती मोर्चाने नेतृत्व केले असून, मोर्चात संविधानप्रेमी वकील नाशिक जिल्हा, संविधान सन्मान वकील समिती, भीम आर्मी, सिटू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लीकन पार्टी, बहुजन शेतकरी संघटना, संविधान प्रेमी नाशिककर, संत रविदास महाराज विचार मंच, आम आदमी पार्टी, भारतीय बौद्ध महासभा आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

मोर्चा गोल्फ क्लबवरून त्र्यंबक नाका, गंजमाळ सिग्नल, शालिमार चौक, महात्मा गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. यावेळी सिटूचे डॉ. डी.एल. कराड, डॉ. संजय अपरांती, प्रा. इंदिरा आठल्ये, बुधाभाऊ साळवे, सुजाता चौदंते आदींनी मार्गदर्शन करताना, इव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. (Latest Marathi News)

INDIA against EVM morcha at nashik
Nashik Adivasi Morcha : ...अन्यथा पुन्हा मुंबईत लाँग मार्च! ‘लाल वादळा’चा ठिय्या कायम

जगभरात इव्हीएम मशिनद्वारे मतदान प्रक्रिया नाकारण्यात आलेली असताना भारतात मात्र सत्ताधारी त्याचा वापर करते आहे. इव्हीएम हॅक होऊ शकते हे सर्वोच्च न्यायालयात काम करणारे वकील सांगत आहेत. देशभरातून त्याविरोधात आवाज उठविला जात आहे.

तरीही भाजप सरकार ते मान्य करायला तयार नाही. आगामी लोकसभा निवडणूक इव्हीएम वापरून झाली तर ही लोकशाहीतील शेवटची निवडणूक असेल. मोदी-शहा देशात लोकशाहीच ठेवणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसाठी, लोकशाही वाचविण्यासाठी इव्हीएमविरोधात आवाज उठविला पाहिजे असे आवाहन करीत,

आगामी निवडणुका या मतपत्रिकेद्वारेच झाल्या पाहिजे अशी मागणी केली. यावेळी विजय बागुल, ॲड. नाना पवार, ज्ञानेश्वर काळे, मुन्ना अन्सारी, अजमल भाई, जितेंद्र शार्दूल, अनिल कौशिक, दिलीप लिंगायत आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

INDIA against EVM morcha at nashik
Nashik Political News : देवळाली मतदारसंघासाठी 3 कोटीचा निधी मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com