EVM Machin : EVM मशिन्स ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम सज्ज

EVM Machin : लोकसभा निवडणुकीत वापरात येणारे इव्हीएम मशिन्स ठेवण्यासाठी १५ तालुक्यांमधील स्ट्राँग रूम सज्ज झाल्या आहेत.
evm machine
evm machineesakal

EVM Machin : लोकसभा निवडणुकीत वापरात येणारे इव्हीएम मशिन्स ठेवण्यासाठी १५ तालुक्यांमधील स्ट्राँग रूम सज्ज झाल्या आहेत. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्स‌ या ठिकाणी राहणार असल्याने आतापासूनच त्यांची चाचपणी केली जात आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी २० मेस मतदान होईल. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासह मतदान निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून यंत्रणा कामाला लागल्या आहेत. (nashik Strong room ready to keep EVM machines )

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी १५ ते २१ एप्रिल या कालावधीत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सचे वाटप केले जाईल. सय्यद पिंप्री येथील गुदामातून हे मशिन्स‌ वितरित केले जातील. तसेच, १५ मतदारसंघांत तालुक्याच्या ठिकाणी हे मशिन्स‌ जतन करण्यासाठी स्ट्राँग रूम उभाण्यात आल्या आहेत. सदर रूमला निवडणूक आयोगाने मान्यता दिली.

असे आहेत स्टाँग रूम ः

नांदगाव : तहसील कार्यालय परिसर, नांदगाव

मालेगाव मध्य : छत्रपती शिवाजी जिमखाना, श्रीरामनगर, मालेगाव

मालेगाव बाह्य : महाराष्ट्र वखार गुदाम, कॅम्प रोड, मालेगाव

बागलाण : जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा (latest marathi news)

evm machine
Electronic Voting Machine : ईव्हीएम मशिनचा वापर सर्वात आधी कोणत्या राज्यात करण्यात आला होता? जाणून घ्या EVM चा रंजक इतिहास

कळवण-सुरगाणा : मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, पंचायत समिती, कळवण

चांदवड-देवळा : पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, चांदवड

येवला : तहसील कार्यालय, येवला

सिन्नर : नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय परिसर, सिन्नर

निफाड : मध्यवर्ती इमारत, रसलपूर शिवार, निफाड

दिंडोरी-पेठ : ‘मविप्र’ महाविद्यालय, उमराळे रोड, दिंडोरी

नाशिक पूर्व : विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी

नाशिक मध्य : दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर

नाशिक पश्चिम : संभाजी स्टेडियम, अश्विननगर, सिडको

देवळाली : गोदावरी हॉल, बांधकाम भवन, त्र्यंबक रोड, नाशिक

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर : सिंहस्थ कुंभमेळा हॉल, नवीन पोलिस ठाणे इमारत, त्र्यंबकेश्वर

evm machine
EVM Machine : 'कुठलेही बटण दाबले तरी मत कमळालाच'! साताऱ्यात निघणार EVM मशिनची अंत्ययात्रा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com