Success Story : एकाचवेळी 3 सरकारी नोकरी परीक्षा उत्तीर्ण; जिद्द, चिकाटीच्या बळावर खुदेजा शेख बनली सहाय्यक कक्ष अधिकारी

Success Story : मनाचा ठाम निश्चय, अंगी जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्य असले, तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. हे देवगाव (ता. निफाड) येथील सामान्य कुटुंबातील खुदेजा अशपाक शेख या तरुणीने सिद्ध केले आहे.
Success Story : एकाचवेळी 3 सरकारी नोकरी परीक्षा उत्तीर्ण; जिद्द, चिकाटीच्या बळावर खुदेजा शेख बनली सहाय्यक कक्ष अधिकारी

मनोहर बोचरे : सकाळ वृत्तसेवा

Success Story : मनाचा ठाम निश्चय, अंगी जिद्द, चिकाटी व अभ्यासात सातत्य असले, तर कुठलीही गोष्ट शक्य होऊ शकते. हे देवगाव (ता. निफाड) येथील सामान्य कुटुंबातील खुदेजा अशपाक शेख या तरुणीने सिद्ध केले आहे. ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पदभरती परीक्षेत २८३ गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने तिची मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली आहे. (nashik Success Story Khudeja Shaikh Passed 3 Govt Job Exams Simultaneously marathi news)

खुदेजाने राज्यातील ओबीसी प्रवर्गामधून मुलींमध्ये राज्यात प्रथम तर एकूण यादीमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे. खुदेजाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे तिने डी. आर. भोसले विद्यालयात माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले. नाशिक येथे मविप्र समाजाचे के.डी.एस.पी.कृषी महाविद्यालयात बीएससी ॲग्रिकल्चर पदवी मिळवली.

खुदेजाला खासगी कंपनीत नोकरीची संधी मिळत होती, पण शिक्षण आणि अभ्यासाची आवड असल्याने तीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारीपद मिळवून समाज सेवेचा संकल्प केला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एकाचवेळी सरकारी नोकरीच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले. (latest marathi news)

Success Story : एकाचवेळी 3 सरकारी नोकरी परीक्षा उत्तीर्ण; जिद्द, चिकाटीच्या बळावर खुदेजा शेख बनली सहाय्यक कक्ष अधिकारी
Nashik Success Story : डोंगरजेच्या तृप्तीची तहसिलपदाला गवसणी! जिद्द, चिकाटीच्या बळावर मिळवले यश

२०२२ ला पोलिस उपनिरीक्षक पदाची मुख्य परीक्षा ४०० पैकी ३१० गुण मिळवून तर तलाठी सरळसेवा पदभरती परीक्षेत २०० पैकी १८५.७७ गुण मिळवून ती दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाली. असे असताना पहिल्या प्रयत्नातच राज्य लोकसेवा आयोगाच्या सेवा परीक्षेत यश मिळवून अवघ्या २५ व्या वर्षीच मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातली.

''स्पर्धा परीक्षेचा अभ्यास नीट समजून घेत, वेळेचे नियोजन केले. आठ ते दहा तास अभ्यास करण्याची तयारी ठेवली. माझ्या यशामध्ये माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द, सातत्य, चिकाटी व प्रयत्न गरजेचे असते.''- खुदेजा शेख

Success Story : एकाचवेळी 3 सरकारी नोकरी परीक्षा उत्तीर्ण; जिद्द, चिकाटीच्या बळावर खुदेजा शेख बनली सहाय्यक कक्ष अधिकारी
Success Story : कष्टाने झिजलेल्या आईच्या हाताला अराम देण्यासाठी यशाला गवसणी घालतोय औशातला 'श्रावणबाळ'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com