Nashik Summer Camp : उन्‍हाळी शिबिरांना जिल्ह्यात सुरवात! क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे संघटनांच्‍या सहकार्याने आयोजन

Nashik News : जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्‍हाळी क्रीडा प्राथमिक कौशल्‍य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे
Summer Camp
Summer Campesakal

Nashik Summer Camp : जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्‍हाळी क्रीडा प्राथमिक कौशल्‍य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्‍हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि विविध क्रीडा संघटनांच्‍या सहकार्याने हे शिबिर होत आहे. गेल्‍या १५ एप्रिलपासून बहुतांश खेळाच्‍या शिबिरांना सुरवात झाली आहे. टप्‍याटप्‍याने मेअखेर हे शिबिर पार पडणार आहेत. (Nashik Summer camps start in district Organized by Office of Sports Officer in collaboration with Associations marathi news)

जिल्ह्यातील विविध ठिकाणी क्रीडा प्रकारानिहाय उन्‍हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरात अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे केले आहे. हे प्रशिक्षण शिबिर विनामूल्‍य स्वरूपाचे आहे. शिबिरात सहभागी झालेल्‍या शिबिरार्थींना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच आहार तज्‍ज्ञ, फिजिओथेरपी, मानसोपचारतज्‍ज्ञ, योगा आंतरराष्ट्रीय खेळाडू, योगा आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे.

* श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात होणारी शिबिरे अशी- (कंसात शिबिर कालावधी) : हॉकी (१५ ते ३० एप्रिल), व्हॉलिबॉल (१५ एप्रिल ते १५ मे), खो-खो (१८ ते ३० एप्रिल), फुटबॉल (१५ एप्रिल ते १५ मे), तलवारबाजी (१५ ते ३० एप्रिल), कबड्डी (१५ ते ३० मे).

* यशवंत व्‍यायामशाळा- ज्यूदो (१५ ते ३१ मे), व्हॉलिबॉल, मल्‍लखांब (१५ ते ३० एप्रिल), बास्‍केटबॉल (१५ ते ३० मे).

* विभागीय क्रीडा संकुल, नाशिक- बॉक्‍सिंग, सिकई मार्शल आर्ट, कराटे, (१५ ते ३० एप्रिल), बास्‍केटबॉल (१५ एप्रिल ते ३० मे). (latest marathi news)

Summer Camp
Summer Care: उन्हाच्या तडाख्यात वाळ्याचे पाणी आरोग्यपूर्ण

* सेंट झेवियर्स स्‍कूल, नाशिकरोड- हॉकी (१५ ते ३० एप्रिल)

* शिवाजीनगर, सातपूर- कुडो, वुशु (१५ ते ३० एप्रिल)

* अटलबिहारी वाजपेई विरंगुळा क्षेत्र, गायत्रीनगर- तलवारबाजी, योगा, जम्‍प रोप, बुद्धिबळ (१५ ते ३० एप्रिल).

* काकासाहेब देवधर स्‍कूल, म्‍हसरुळ- तलवारबाजी (५ ते १५ मे).

* डे केअर शाळा, रामनगर- बेसबॉल, सॉफ्टबॉल (१५ ते ३० एप्रिल).

* के. एन. केला स्‍कूल, नाशिकरोड- हॉकी (१५ ते ३० एप्रिल),

* देवळाली कॅम्‍प- हॉकी, क्रिकेट, फुटबॉल (१५ ते ३० एप्रिल).

* तालुका क्रीडा संकुल निफाड- हॉकी (१ ते १५ मे).

* तालुका क्रीडा संकुल सुरगाणा- मैदानी हॅण्डबॉल (१५ ते ३० एप्रिल).

* तालुका क्रीडा संकुल, निफाड- कबड्डी (२१ एप्रिल ते १० मे).

* तालुका क्रीडा संकुल, त्र्यंबक- मैदानी (१५ ते ३० एप्रिल).

* तालुका क्रीडा संकुल, येवला- जलतरण, कराटे, स्केटिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस (१५ ते ३० एप्रिल).

* तालुका क्रीडा संकुल, इगतपुरी- व्हॉलिबॉल, कॅरम, बॅडमिंटन, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ, टेबल टेनिस (१५ ते ३० एप्रिल).

Summer Camp
Summer Health Care : उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखा अन् धोका टाळा..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com