Nashik Adivasi Morcha: आदिवासी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत! वाहतूक शाखेकडून पर्यायी मार्गांचे नियोजन

Adivasi Morcha : आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
Nashik Adivasi Morcha
Nashik Adivasi Morchaesakal

नाशिक : आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात अद्याप तोडगा न निघू शकल्याने ते लांबण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे स्मार्ट रोड वाहतुकीसाठी बंद असल्याने पर्यायी मार्गांवरही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

त्यामुळे शहर वाहतूक शाखेने नव्याने पर्यायी वाहतूकीचे नियोजन केले असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (Nashik Adivasi farmers morcha alternative routes by Transport Department marathi news)

माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नल या दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यायी मार्गांवरही वाहतूक कोंडी होत आहे.

या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक मार्गात बदल केले असून, १ ते २ मार्च रोजी कालावधीत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका सिग्नल वाहतुकीसाठी बंद राहील. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. (Latest Marathi News)

Nashik Adivasi Morcha
Mumbai High Court: अटकपूर्व जामीन प्रकरणे लवकर निकाली काढणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर मुंबई उच्च न्यायालयाचा 'हा' मोठा निर्णय

पर्यायी मार्ग

- सारडा सर्कल ते शालिमारकडे येणारी वाहतूक ही खडकाळी सिग्नलमार्गे मोडक सिग्नल, जलतरण तलाव सिग्नल मार्गे इतरत्र वळविण्यात आली आहे.

- मोडक सिग्नलकडून येणारी वाहतूक सिबीएस सिग्नल येथून डावीकडे वळण घेऊन टिळकवाडी सिग्नलकडे मार्गस्थ.

- गंगापूर रोडने रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक जनावरांचा दवाखाना ते घारपुरे घाटाने अशोकस्तंभमार्गे रामवाडी पुलावरून पंचवटीकडे मार्गस्थ.

- पंचवटीकडून रविवार कारंजाकडे व पंचवटीकडे येणारी वाहतूक मालेगांव स्टॅण्ड येथून मखमलाबाद नाका-रामवाडी मार्गे चोपडा लॉन्सकडे मार्गस्थ.

- कॅनडा कॉर्नरकडून सिबीएसकडे येणारी वाहतूक राणे डेअरी - मॅरेथॉन चौकमार्गे, तसेच टिळकवाडी, रामायण बंगला, जलतरण सिग्नलमार्गे मार्गस्थ. (Latest Marathi News)

Nashik Adivasi Morcha
Shivajirao Adhalrao : शिरूर लोकसभा निवडणुकीबद्दल शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मोठे वक्तव्य...

आयुक्तांनी घेतली भेट

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुरुवारी (ता. २९) दुपारी आदिवासी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला. यावेळी आंदोलकांना उद्‌भवणाऱ्या अडचणींही जाणून घेत, त्यानुसार जादा पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधा पुरविण्यात आल्या.

यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचीही भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

Nashik Adivasi Morcha
VSHORADS Missile: स्वदेशी VSHORADS क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी, युद्ध क्षमतेला कशी मिळेल चालना?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com