Kaksparsh
Kaksparshesakal

Nashik News : रामतीर्थावर काकस्पर्श दुर्मिळ! तपोवन रस्त्यावरील स्मृतिवन उद्यानाजवळ गर्दी

Nashik News : रामतीर्थावरील गंगा गोदावरी मंदिरावरील बाजूस काही काळापूर्वी ‘पितरांना घास’ देण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती

Nashik News : रामतीर्थावरील गंगा गोदावरी मंदिरावरील बाजूस काही काळापूर्वी ‘पितरांना घास’ देण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती. सध्या तेथील वृक्ष कमी झाल्याने काकस्पर्श दुर्मिळ झाला आहे, त्यामुळे कावळ्याला घास देण्यासाठी तपोवन रोडवरील नवीन शाही मार्गालगतच्या स्मृतिवन उद्यानाला नागरिकांची पसंती मिळत आहे. याठिकाणी भल्या सकाळपासून दिवसभर श्रद्धाळूंची ‘काकस्पर्शां’साठी मोठी गर्दी उसळते. (Nashik trees decreasing on Ram Tirtha marathi news)

गंगा गोदावरीवरील रामतीर्थाचे महत्त्व सर्वदूर असल्याने याठिकाणी श्राद्धादी विधींसाठी वर्षभर गर्दी असते. साधारणत: ऐंशीच्या दशकापर्यंत रामतीर्थ परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी होती. कालौघात ती कमी झाली आहे. त्यामुळे नवीन शाही मार्गावरील व पंचवटी स्मशानभूमी शेजारील स्मृतिवन उद्यानालगतच्या परिसराला सुलभ काकस्पर्श होत असल्याने श्रद्धाळू भाविकांची मोठी पसंती मिळते.

पितृपक्षातही गर्दी

पितृपक्षात अनेकजण घराच्या गच्चीवर, झाडांलगत किंवा मोकळ्या जागी कावळ्याला घास ठेवतात. मात्र सगळीकडील देशी वृक्षराजी कमी झाल्याने शहरातील अनेकजण काकस्पर्शासाठी स्मृतिवन उद्यानालगत येतात. याकाळात येथे काकस्पर्शासाठी शेकडोजण उपस्थित असतात. शेजारीच वर्दळीचा रस्ता असल्याने अलीकडे याठिकाणीही बराचवेळ कावळ्यांची वाट पहावी लागते, परंतु उशिरा का होईना काकस्पर्श होत असल्याने अद्यापही घासासाठी याच ठिकाणाला मोठी पसंती आहे. (Latest Marathi News)

Kaksparsh
Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

रिक्षाचालकांना रोजगार

काकस्पर्शासाठी स्मृतिवन उद्यानात पोचविण्यासाठी बाहेरच्या राज्यातून आलेल्या अनेकांना स्थानिक रिक्षाचालकांचा आधार मिळतो. सिटसनुसार व तेथे लागणारा वेळ लक्षात घेऊन रिक्षाचालक वेगवेगळे दर आकारतात. अनेकजण फक्त त्याठिकाणी भाविकांना पोचविण्याचे काम करतात. यातून अनेक रिक्षाचालकांना रोजगार प्राप्त झाला आहे.

स्वच्छता गरजेची

कावळ्यासाठी घास ठेवल्यावर किंवा कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यावर अनेकजण निघून जातात. कावळाही एखादा घास घेतल्यावर उडून जातो, यामुळे त्याठिकाणी राहिलेल्या पात्रातील अन्न तसेच पडून राहाते, ते खाण्यासाठी याठिकाणी मोठ्या संख्येने कुत्रे जमा होतात. त्यामुळे याठिकाणी महापालिकेतर्फे कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी ठेवल्यास खराब झालेले अन्नही पडून राहणार नाही व कुत्र्यांचा उपद्रवही थांबेल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Kaksparsh
Wedding Season : लग्न सराईमुळे फुलबाजार तेजीत! गेल्यावर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांनी दरवाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com