Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्रॉफिक सेल कार्यान्वित; शहरात वाहतुकीचे नियोजन

Kumbha Mela : शहराचा वाढता विस्तार व त्याअनुषंगाने वाहनांची वाढती संख्या, तसेच आगामी कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने ट्रॉफिक सेल कार्यान्वित केला आहे.
Nashik Kumbha Mela
Nashik Kumbha Melaesakal

Nashik Kumbh Mela : शहराचा वाढता विस्तार व त्याअनुषंगाने वाहनांची वाढती संख्या, तसेच आगामी कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेने ट्रॉफिक सेल कार्यान्वित केला आहे. या माध्यमातून शहरात वाहतूक व्यवस्थेचे नियोजन व वाहतुकीच्या अनुषंगाने पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या वाहतूक मंत्रालयाने अपघात व अपघातातून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना ट्रॅफिक सेल कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (nashik Trophic cell operation in background of Kumbh Mela )

त्याअनुषंगाने महापालिकेत ट्रॅफिक सेल कार्यान्वित झाला असला तरी त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व यंत्रणा नसल्याने त्या सेलकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून पाहिले गेले. मात्र, आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रॅफिक सेल कार्यान्वित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शहराची लोकसंख्या सद्यःस्थितीत २२ लाखांच्या आसपास आहे. २०५० पर्यंत हीच लोकसंख्या ६० लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

त्यामुळे शहरांमध्ये वाहतूक समस्या निर्माण होतील व कोंडीच्या निमित्ताने ध्वनी व वायुप्रदूषण निर्माण होईल. त्यामुळे ट्रॅफिक सेल कार्यान्वित करणे आवश्यक आहे. महापालिकेला तशा सूचनादेखील करण्यात आल्या होत्या. राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिकेला पत्र पाठवून वाहतूक व्यवस्था नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. (latest marathi news)

Nashik Kumbha Mela
NMC Kumbha Mela Fund Audit: सिंहस्थाच्या निधीचे ऑडिटच नाही! माहितीच्या अधिकारातून बाब उघड

ट्रॅफिक सेल माध्यमातून वाहतूक आराखडा तयार करणे, वाहनतळांची निर्मिती व वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे, रस्त्यांवर सायकल ट्रॅक उभारणे, झेब्रा क्रॉसिंग तसेच फुटपाथ व गतिरोधकांची निर्मिती करणे, सार्वजनिक वाहतुकीसाठी डेपो शेल्टरची उभारणी करणे, पूल व बांधकाम, व ब्लॅक स्पॉट निर्मूलन करण्याची जबाबदारी ट्रॉफिक सेलवर आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे ही महत्त्वाची जबाबदारी आहे. ट्रॉफिक सेलकरिता कार्यकारी अभियंता व उपअभियंता व सहाय्यक अभियंता तसेच दोन कनिष्ठ अभियंता अशा एकूण आठ पदांची निर्मितीदेखील महापालिकेकडून केले जाणार आहे.

''शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी ट्रॅफिक सेलचे निर्मिती करणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने कारवाई करण्यात आली असून यापुढे वाहतूक कक्षाच्या माध्यमातून सर्व नियोजन केले जाईल.''- सचिन जाधव, कार्यकारी अभियंता, महापालिका.

Nashik Kumbha Mela
Kumbha Mela 2027 : कुंभमेळ्यासाठी सव्वाचार हजार कोटी खर्चाचा अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com