Youth Drown : प्रवरा पात्रालगतच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू! सिन्नरमधील एकाचा समावेश

Nashik News : सुगाव (ता. अकोले) येथे प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Sagar Jedgule
Sagar Jedguleesakal

Nashik News : सुगाव (ता. अकोले) येथे प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या पाझर तलावात अंघोळीसाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांपैकी एक जण सिन्नर तालुक्यातील धुळवड येथील असून दुसरा पेमगिरी (ता.अकोले) येथील रहिवासी आहे. सागर पोपट जेडगुले (वय २५; रा. रामोशी वाडी. धुळवड ता. सिन्नर) (Two died after drowning in lake near Pravara Patra)

व अर्जुन रामदास जेडगुले (23) राहणार पेमगिरी ता अकोले हे दोघेजण सुगाव येथे असलेल्या धुमाळ वस्तीवर मुरघास बनवण्यासाठी गेले होते. दुपारच्या उन्हात त्यांना नदीपात्रात पोहण्याचा मोह आवरला नाही.

दोघेजण अंघोळ करण्यासाठी प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते. तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. (latest marathi news)

Sagar Jedgule
Ujni Boat Accident: उजनी धरणातील 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, नातेवाईकांचा एकच आक्रोश

दोघांपैकी सागर याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले. अर्जुन याचा मृतदेह शोधण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.

Sagar Jedgule
Pune Porsche Accident : पुण्यातील आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट कशी? माजी गृहमंत्र्यांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com