Nashik News : रविशंकर मार्गावर दुचाकीने घेतला पेट

Nashik : रविशंकर मार्गालगत कोर्ट यार्ड सोसायटीसमोर रविवारी (ता. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास मोकळ्या जागेत दुचाकीने अचानक पेट घेतला.
Two wheeler caught fire on Ravi Shankar Marg
Two wheeler caught fire on Ravi Shankar Margesakal

डीजीपीनगर : रविशंकर मार्गालगत कोर्ट यार्ड सोसायटीसमोर रविवारी (ता. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास मोकळ्या जागेत दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक पेटती दुचाकी सोडून मोकळ्या ठिकाणी पळाल्याने तो बचावला, मात्र इजा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (Nashik Two wheeler caught fire on Ravi Shankar Marg marathi news)

दरम्यान, उपनगर पोलिस ठाण्याच्या हवालदारांनी घटनास्थळी धाव घेत कृष्णा गायकवाड, अतुल पाटील, आय. एन. शेख यांनी बादलीने, तर अग्निशमन दलाकडून आग विझविण्यात आली.

Two wheeler caught fire on Ravi Shankar Marg
Nashik News : थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित! पिंपळगाव महावितरणकडून वसुलीसाठी धडक मोहीम

अग्निशमन दलाचे कर्मचारी रामदास काळे, प्रतीक सोनवणे, लक्ष्मण बेंद्रे यांनी आग नियंत्रणात आणली. आगीत दुचाकीची नंबरप्लेट जळून खाक झाल्याने मालकाचा शोध घेणे अवघड झाले होते.

चेसीज नंबरवरून मालकाचा शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. जळालेली दुचाकी उपनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत. (latest marathi news)

Two wheeler caught fire on Ravi Shankar Marg
Nashik News : ‘जातेगाव’ आरोग्य केंद्राला ‘कायाकल्प’ पुरस्कार; जिल्ह्यातील 32 आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com