Nashik News : नेत्यांनो, पाणी अन चाराटंचाईवर कधी बोलणार? असहाय शेतकऱ्यांचा आर्त प्रश्न

Nashik : जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ असून, चारा अन पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
drought
droughtesakal

Nashik News : जिल्ह्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ असून, चारा अन पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिलच्या अखेरीसच २७३ गावे, ६५५ वाड्यांतील पाच लाख ३८ हजार नागरिकांना सुमारे २८६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. जूनपर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने पशुधन जगविण्याची कसरत आहे. या गंभीर समस्या भेडसावत असताना उमेदवार आणि नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. ( unprecedented drought in district this year and problem of fodder and water has become serious )

सामान्यांच्या हिताच्या प्रश्नांवर बोलायला कुणीच तयार नाही. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविला जात आहे. प्रत्यक्षात यावर कधी बोलणार? असा प्रश्न सामान्य मतदार आणि जनतेमधून विचारला जात आहे. एकीकडे तीव्र उष्णतेचे अन दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी महायुती व विरोधी महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

सत्ताधारी तसेच विरोधातील बड्या नेत्यांनी हजेरी लावली. शेतीमालाला भाव नाही, कांद्याचा प्रश्न भिजत पडलाय, या धामधुमीत जिल्ह्यातील दुष्काळ, टंचाई मात्र गायब झाली की काय? असे चित्र निर्माण केले जात आहे. पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती यावर ना उमेदवार बोलायला तयार आहे, ना नेते. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी या दोन्ही बाजूंनी दुष्काळाची समस्या आपल्या प्रचारातून हद्दपार झालेली दिसते.

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. केवळ ६९ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगामाला फटका बसला. पाणी नसल्याने गेल्या वर्षी उन्हाळ्यात सुरू झालेले पाण्याचे टॅंकर पावसाळयापासून सुरूच आहेत. जिल्ह्यात एक हजार ५०० हून अधिक गावे असून, लोकसंख्याही ३५ लाखांच्या जवळपास आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. (latest marathi news)

drought
Nashik News : खेळण्यासाठी गेलेली 2 बालके पाण्यात बुडाली; सिन्नरच्या रामनगर मध्ये सख्या बहिण-भावाचा मृत्यू

जिल्ह्यातील छोटे-मोठे २४ प्रकल्प मिळून केवळ २३.८९ टक्के पाणीसाठा (२५ एप्रिलच्या नोंदीनुसार) शिल्लक आहे. गेल्या वर्षी हाच जलसाठा ४० टक्क्यांवर होता. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. त्यामुळेच टॅंकरची संख्या वाढत चालली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल ३० टॅंकर वाढले असल्याचे वास्तव आहे.

सद्यस्थितीत ९१८ गावे-वाड्यांना (२९ एप्रिलची टॅंकरची स्थिती) २८६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, मे आणि जून पूर्ण महिना कसा जाणार, याची चिंता शेतकऱ्यांसह सर्वांनाच लागली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाऱ्याचाही प्रश्न गंभीर आहे. १५ जूनपर्यंत पुरेल इतकाच चारा जिल्ह्यात शिल्लक आहे.

पुरेसा चारा नसल्याने बाजारात पशुधन कवडीमोल भावात विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. याचा फटका सामान्य शेतकरी आणि जनतेलाच बसत आहे. असे असतानाह लोकप्रतिनिधी, नेते, उमेदवार यावर काहीच बोलत नाहीत. जो-तो आपापली समीकरणे ठरविण्यात व्यस्त आहे.

drought
Nashik News : मुंगसे बाजार समिती अखेर सुरु; पहिल्याच दिवशी 15 हजार क्विंटल कांद्याची आवक

पाच लाख ३८ हजार लोकांच्या घशाला कोरड

जिल्ह्यात टंचाईचे संकट गडद होत आहे. दररोज गावा-गावांमधून टॅंकरची मागणी होऊ लागली. १५ तालुक्यांमधील तब्बल १० तालुक्यांमधील ९१८ गाव-वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावातील एकूण लोकसंख्या ही पाच लाख ३८ हजार ७६३ इतकी आहे.

तालुकानिहाय विचार केल्यास बागलाण (३५), चांदवड (३१), देवळा (३२), मालेगाव (३६), नांदगाव (६९), सिन्नर (१७), सुरगाणा (८) व येवला (४७) येथे टॅंकर सुरू आहेत. तीन दिवसांत प्रशासनाकडे टॅंकर सुरू करावेत, असे आणखी २५ प्रस्ताव प्राप्त झाल्याचे बोलले जात आहे. एप्रिलअखेरीलाच टॅंकरचे त्रिशतक होत असल्याने मे व जूनपर्यंत टॅंकरची मागणी ५०० वर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

drought
Nashik News : ग्रामीण रुग्णालयात उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष; वाढत्या उन्हाळ्यामुळे आरोग्य विभागाचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com