Nashik Unseasonal Rain News : अवकाळी पावसाची शहरात हजेरी; पार्यात किरकोळ घसरण

Nashik News : काही ठिकाणी हलक्‍या सरी, तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. २.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे
Unseasonal Rain
Unseasonal Rainesakal

Nashik Unseasonal Rain News : शहरासह उपनगरी भागांमध्ये पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्‍या सरी, तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. २.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे. दरम्‍यान पाऊस व वातावरणातील वाऱ्यामुळे पार्यात किरकोळ घसरण झाली आहे. राज्‍यभरातील विविध जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तविली होती. (Nashik Unseasonal rain in city news)

गुरुवारी (ता. २५) शहरात दिवसाच्‍या वेळी आकाश पूर्ण मोकळे होते. परंतु मध्यरात्रीतून ढग दाटून येत काही मिनिटांसाठी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहाटेच्‍या वेळी झालेल्‍या पावसामुळे शहरासह उपनगरी भागांतील रस्‍ते ओले झाले होते. तर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याचेही दृष्य सकाळच्‍या वेळी बघायला मिळाले.

नाशिकमध्ये २.६ मिलिमीटर पाऊस झाल्‍याची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे. दरम्‍यान उकाड्यापासून त्रस्त असलेल्‍या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली आहे. अवकाळी पावसामुळे पारा किरकोळ स्वरूपात घसरला आहे. (Latest Marathi News)

Unseasonal Rain
Solapur Unseasonal Rain : अक्कलकोटसह सोलापुरात अवकाळीचा तडाखा

गुरुवारी (ता.२५) नाशिकचे किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस नोंदविले होते. तर कमाल तापमान पुन्‍हा एकदा चाळीस अंशाच्‍या उंबरठ्यावर पोचताना ३९.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. मध्यरात्री झालेल्‍या पावसामुळे शुक्रवारी (ता. २६) नाशिकचे किमान तापमान साधारणतः एक अंशाने घसरून २१.६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमानात दोन अंशापेक्षाची घसरण होऊन ३७.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

Unseasonal Rain
Latur Unseasonal Rain : लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं! फळबागांसह शेतातील ज्वारी पिकाचं प्रचंड नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com