Deputy Commissioner Ganesh Shinde while guiding the meeting for voting awareness of looms, textile, rickshaw union, hotel, mangal office, business associations in the city, municipal officials, employees, office bearers of various organizations in front.
Deputy Commissioner Ganesh Shinde while guiding the meeting for voting awareness of looms, textile, rickshaw union, hotel, mangal office, business associations in the city, municipal officials, employees, office bearers of various organizations in front. esakal

Nashik News : मतदान करणाऱ्यांना खरेदीवर 5 ते 10 टक्के सूट! कापड व्यापारी संघटनेतर्फे निर्णय

Nashik News : संघटनेचे अध्यक्ष संजय फतनानी यांनी मतदान करणाऱ्या ग्राहकांना निश्चित सवलत देणार असल्याचे सांगितले

मालेगाव : लोकसभा निवडणुकीसाठी धुळे लोकसभा मतदारसंघातील मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघातील विशिष्ट मतदान केंद्राबाहेर निवडणूक आयोगाच्या आवाहनासोबतच व्यापारी संघटनेचे नाव असलेले सेल्फी पॉइंट ठेवण्यात येणार आहे. त्या पॉइंटवर मतदान करून सेल्फि दाखवणाऱ्या मतदारांना कापड व रेडीमेड खरेदीवर ५ ते १० टक्के सवलत देवू असे कापड व्यापारी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष संजय फतनानी यांनी मतदान करणाऱ्या ग्राहकांना निश्चित सवलत देणार असल्याचे सांगितले. (Nashik Voters get 5 to 10 percent discount on shopping news)

सदस्य प्रसन्न सुराणा यांनी त्यांच्या संघटनेचे सदस्य व त्यांचे परिवार, नातेवाईक यांच्यासह १०० टक्के मतदान करण्याची ग्वाही दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपायुक्त गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील यंत्रमाग, कापड, रिक्षा युनियन, हॉटेल, मंगल कार्यालय व इतर व्यापारी संघटनांची मतदान जनजागृती बैठक झाली.

त्यावेळी कापड व्यापारी संघटनेने सवलतीची घोषणा केली. श्री. शिंदे यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी स्वत: सक्रिय सहभाग घेताना कामगार, कर्मचारी व ग्राहकांना मतदान करण्यासाठी आवाहन करावे. मतदान जनजागृतीचे पोस्टर्स दुकान, हॉटेल, पॉवरलूम, मंगल कार्यालय आदींच्या दर्शनी भागात लावावीत असे आवाहन केले. (Latest Marathi News)

Deputy Commissioner Ganesh Shinde while guiding the meeting for voting awareness of looms, textile, rickshaw union, hotel, mangal office, business associations in the city, municipal officials, employees, office bearers of various organizations in front.
Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी २० मेस होणाऱ्या मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. शहरात यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने यंत्रमागमध्ये काम करीत असलेल्या मजुरांना यंत्रमाग, व्यापारी यांनी मतदानाच्या दिवशी पगारी सुट्टी द्यावी. रिक्षा युनियन, कापड व्यापारी, पॉवरलूम व्यापारी यांनी मतदान जनजागृतीबाबत विविध सूचना केल्या. त्यावर उपायुक्तांनी आपण केलेल्या सूचनांचे मनपामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

निवडणूक विभाग प्रमुख अनिल कोठावदे, शहरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोहम्मद युसूफ इलियास, डॉ. रईस सिद्दिकी, आकील अहमद अब्दुल खालिक, सुनील चांगरे, संजय फतनानी, दिनेश सोनवणे, नरेंद्र जाधव, कैलास छाजेड, प्रसन्न सुराणा, कैलास जाधव, डॉ. टी. पी. देवरे, बंडू माहेश्वरी, शेख मझहर, अभिषेक भावसार उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Deputy Commissioner Ganesh Shinde while guiding the meeting for voting awareness of looms, textile, rickshaw union, hotel, mangal office, business associations in the city, municipal officials, employees, office bearers of various organizations in front.
Online Gambling : मुलं ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात! पॉकेटमनीचा वापर जुगारासाठी; कधीतरी पैसे मिळण्याची आशा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com