Nashik Water Crisis : वणीवर पाणीकपातीची टांगती तलवार! ओझरखेड धरणात केवळ मृतसाठाच शिल्लक

Nashik News : वणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाने तळ गाठल्याने पाणीकपातीची टांगती तलवार आहे
Dead water remaining in the dam at Ozarkhed.
Dead water remaining in the dam at Ozarkhed. esakal

वणी : वणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ओझरखेड धरणाने तळ गाठल्याने पाणीकपातीची टांगती तलवार आहे. धरणात केवळ मृतसाठाच शिल्लक राहिल्याने नागरीकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Nashik Water Crisis Ozarkhed Dam marathi news)

ओझरखेड धरणातील जॅकवेलचा भाग उघडा पडला आहे. शिवाय जॅकवेलमधील पाणीपातळी खाली गेली आहे. वीजपंप वीस फुटापेक्षा जास्त खोल सोडावे लागले आहे. शहराला रोज १५ लाख लिटर पाणी लागते. विविध भागात ठरलेल्या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता.

परंतु, पाणीपातळी घटल्याने आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील प्रमुख ३.५ लाख लिटर पाण्याच्या टाकीतून जवळपास ४० टक्के शहरात पाणीपुरवठा होतो. तसेच, मोठा कोळीवाडा येथील २ लाख लिटर, बोरीचा पाडा येथील ३० हजार लिटर, टेकाडीपाडा १ लाख ६० लिटर आणि सबस्टेशनला ७० हजार लिटर पाणीपुरवठा होत आहे.  (latest marathi news)

Dead water remaining in the dam at Ozarkhed.
Nashik Water Crisis : नाशिक जिल्ह्यातील 5 लाख लोकांच्या घशास कोरड! 768 गाव-वाड्यांना 256 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

शहराचा वाढता विस्तार पाहता वितरीत होणारा पाणीपुरवठा कमी आहे. संस्कृती नगर परिसरात वाढलेल्या लोक वस्तीमुळे पाणी कमी पडू लागले आहे. ओझरखेड धरणातील पाण्याचे ठरलेले आवर्तन सोडल्याने पाणी साठा अगदी कमी झाला आहे. वाढत्या उन्हामुळे देखील पाणी पातळीत काहीशी घट होत आहे. अजून एप्रिल, मे, जून महिन्याचे काही दिवस पाणी पुरले नाही तर वणीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.

"जॅकवेलमधील पाणी कमी गेल्यावर वीजपंप खाली सोडावा लागतो. येथून दोन पंपांच्या सहाय्याने वणी येथे पाणी नेले जाते. जॅकवेलमधील पाणीपातळी अगदी खालावल्यास धरणाच्या पाण्यात पंप टाकून जॅकवेलमध्ये पाणी आणावे लागते. अजून तशी वेळ नाही. पाणी साठ्यानुसार शहरात पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात आला आहे."

- यादव मोरे, पाणी पुरवठा कर्मचारी, वणी

Dead water remaining in the dam at Ozarkhed.
Dhule Water Crisis : पाण्याचा टिपूस नसल्याने वानरे व्याकूळ! पाणवठे तयार करण्याचा वनविभागाला विसर ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com