Nashik News : सुधारित मंजुरीसाठी रखडली पाणीयोजना! 70 वरून प्रतिमाणसी 135 लिटरचा प्रस्ताव शासनदरबारी धूळखात

Nashik News : आधीच्या योजनेत ७० लीटर प्रतिमाणसी प्रतिदिनऐवजी १३५ लिटरप्रतिदिन पाणीपुरवठा असा सुधारित प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलेला आहे, मात्र आता सव्वा वर्षे होऊनही तो शासनदरबारी धूळखात पडून आहे
Stalled work of new independent water supply scheme started for Deola city.
Stalled work of new independent water supply scheme started for Deola city. esakal

देवळा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत रामेश्वर येथील किशोरसागर धरणातून देवळा शहरासाठी सुरू असलेल्या ९ कोटी ७२ लक्ष रुपये किमतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार होती, परंतु कामाबाबत तक्रारीमुळे शासनाने स्थगिती दिली होती, गेल्या तीन वर्षांपासून हे काम ठप्प होते.

वर्षभरापूर्वी चौकशीनंतर या कामावरील स्थग्रिती उठविण्यात आली मात्र अद्यापही कामास सुरुवात झालेली नाही. आधीच्या योजनेत ७० लीटर प्रतिमाणसी प्रतिदिनऐवजी १३५ लिटरप्रतिदिन पाणीपुरवठा असा सुधारित प्रस्ताव शासनाकडे देण्यात आलेला आहे, मात्र आता सव्वा वर्षे होऊनही तो शासनदरबारी धूळखात पडून आहे. लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. (Nashik Water scheme stalled for revised approval news)

सुंदर देवळा संकल्पनेंतर्गत साडेनऊ कोटी रुपयांच्या या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला देवळा नगरपंचायतीच्या तत्कालीन कार्यकारी मंडळाच्या बैठकीत २०१९ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. शासनाकडे योजनेचा प्रस्ताव सादर केल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर त्यास मंजुरी मिळून कामास प्रारंभ झाला होता.

ही योजना पूर्ण झाल्यानंतर किशोरसागर धरणासाठी पाणी आरक्षित करण्यात येऊन चणकापूर उजव्या कालव्यामधून दरवर्षी दोन आवर्तन देवळा शहरासाठी नियमितपणे मिळणार होते. यामुळे देवळा शहराचा पाणीप्रश्न मार्गी लागून किशोरसागर धरण व कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना तसेच निवाणे, भेंडी, वरवंडी, मटाणे, वाजगाव, भऊर, रामेश्वर आदी गावांनादेखील याचा लाभ झाला असता. (latest marathi news)

Stalled work of new independent water supply scheme started for Deola city.
Jalgaon Water Crisis : वरणगावात 15 दिवसांआड पाणीपुरवठा; योजनांवरील कोट्यवधींचा खर्च पाण्यात

सध्याची पाणी योजना अपुरी

देवळा शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पाहता सध्याची पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. गिरणा नदीला सोडण्यात येणाऱ्या आवर्तनांवर ही योजना अवलंबून आहे. आवर्तन बंद झाले, की योजना ठप्प होते. गिरणा नदीला आवर्तन सोडले नसेल त्यावेळी या नवीन पाणीपुरवठा योजनेमार्फत किशोरसागर धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येऊन शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ही योजना पूरक ठरणार आहे.

"महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरीत्थान महाअभियानांतर्गत देवळा शहर पाणीपुरवठा योजनेची स्थगिती ३१ जानेवारी २०२३ ला उठविली. ही योजना ७० लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती या पाणीपुरवठा दराने असल्याने सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार सुधारणा करून १३५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ति अशी करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर या सुधारित योजनेची शासन आदेशनुसार कामकाज सुरू करण्यात येईल."

- प्रमोद ढोरजकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत देवळा

Stalled work of new independent water supply scheme started for Deola city.
Dhule Water Crisis : तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळित; देवपूरमधील काही भागाला फटका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com