Nashik Weather Forecast: जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’!

Heavy Rain file photo
Heavy Rain file photoesakal

Nashik Weather Forecast : जिल्ह्यात शनिवारी (ता. ३०) हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

वाऱ्याचा वेग तासाला ३० ते ४० किलोमीटर राहील. ३ ऑक्टोबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Nashik Weather Forecast monsoon rain Red Alert today in district)

आकाश ढगाळ राहणार असून, तापमान कमाल ३० ते ३३, किमान १९ ते २२ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग तासाला ९ ते १५ किलोमीटर राहील. दरम्यान, अनंत चतुर्दशीला वरुणराजाने बहुतांश भागांत उसंत घेतली होती.

आळंदी, करंजवण, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर, नांदूरमध्यमेश्‍वर धरण ‘फुल्ल’ झाले आहेत. गंगापूर धरणात ९८, कश्‍यपी ९८, गौतमी गोदावरी ९७, पालखेड ९८, ओझरखेड ९४, पुणेगाव ९७, मुकणे ९२, चणकापूर ९७, पुनंदमध्ये ९९ टक्के साठा आहे.

गिरणा धरणात ५६, तिसगाव ६७ व माणिकपुंज २८ टक्के साठा झाला. नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, नगर जिल्ह्यात या महिन्यात १५१.३ टक्के पाऊस २९ दिवसांत झाला आहे. आतापर्यंत नाशिक विभागात ७७ टक्के पावसाची नोंद झाली.

गेल्या वर्षी विभागात १११.५ टक्के पाऊस झाला होता. राज्यात या महिन्यात १२६.९ टक्के, तर यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी राज्यात ११४.४ टक्के पावसाची नोंद झाली होती.

Heavy Rain file photo
Monsoon Update : मान्सून अतिसक्रिय! राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाची माहिती

तालुकानिहाय पावसाची स्थिती (आकडे टक्क्यांमध्ये)

तालुक्याचे नाव सप्टेंबरमधील आतापर्यंतचा गेल्या वर्षीचा

मालेगाव १२२.८ ७३.१ १७०.६

बागलाण १०३.७ ७५.८ १७४.८

कळवण १९६.९ ९९.३ १८२.९

नांदगाव ११३.१ ६७.७ १५६.९

सुरगाणा १३०.९ ७८.३ १३१.१

नाशिक १७१.२ ७३.२ १४८.२

दिंडोरी १८९.६ १२०.१ २३३.४

इगतपुरी ९९.५ ५४.५ ७५.४

पेठ १०६.८ ७३.१ १३६.५

निफाड ११४.३ ७६ १६५.२

सिन्नर १२९.८ ६८.९ १६१.६

येवला १७१.६ ८८.७ १३०.६

चांदवड १६०.७ ७२.९ १९९.८

त्र्यंबकेश्‍वर १७७.४ ७४.३ १०२.३

देवळा १२७.२ ७३.४ १८८.५

जिल्हा १३४ ६८.७ १२९.४

Heavy Rain file photo
Akola Rain News : अकोला जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी; नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com