Women's Day Special: अंगणवाडीच्या भिंती चिमुकल्यांशी साधताय संवाद! संकल्पनेतून साकारल्या बोलक्या अंगणवाड्या

Women's Day Special : मुले हसतील, खेळतील व अभ्यासही करतील या उद्देशाने नांदगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे रुपडे पालटून तेथील भिंती बोलक्या बनल्या आहेत.
Shailaja Nalavde
Shailaja Nalavdeesakal

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

Women's Day Special : मुले हसतील, खेळतील व अभ्यासही करतील या उद्देशाने नांदगाव तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे रुपडे पालटून तेथील भिंती बोलक्या बनल्या आहेत. कार्टून्ससह महापुरुषांची छबी, बडबडगीते, कविता, गाणी आणि चांद्रयानची प्रतिकृती यामुळे नवीन अंगणवाडी इमारतींच्या भिंती चिमुकल्यांशी संवाद साधू लागल्या आहेत. (nashik Women Day Special Anganwadi marathi news)

निर्णय घेण्याचे अधिकार आल्यानंतर महिलांमधील मूलभूत गुण असलेल्या संवेदनशीलता आणि सृजनता यांचा त्यांच्या कामातही कसा ठसा उमटतो, हे नांदगाव तालुक्यातील स्मार्ट अंगणवाडी बघितल्यानंतर जाणवते. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या बोलक्या अंगणवाड्या हा सध्या कौतुकाचा विषय झालेला आहे.

अंगणवाडी म्हटले, की केवळ चार भिंती. या पारंपरिक अंगणवाडीत बालकांना शिकविले जात. मात्र अभियंता शैलेजा नलावडे यांच्या संकल्पनेतून अंगणवाडीतील सेवा अधिक प्रभावशाली बनविण्यासाठी इमारतींमध्ये रचनात्मक बदल केले. बोलकी भिंत चित्र पद्धतीचा अवलंब करत अंगणवाडी बांधकामे करण्यात येत आहेत.

नांदगाव तालुक्यात ३९ अंगणवाडी खोल्या बांधण्यात आल्या आहेत. पानेवाडी येथील अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. बांधकाम अत्यंत दर्जेदार व देखण्या पद्धतीने करण्यात आले आहे. लहान मुले व त्यांच्या पालकांचे मन रमेल, अशा पद्धतीने या अंगणवाडी केंद्रांचे काम करण्यात आले आहे. गावागावातील अंगणवाडी केंद्रे सध्या कात टाकू लागली आहेत. (latest marathi news)

Shailaja Nalavde
Women's Day Special: बॉलिवुडच्या 'या' क्वीन ज्यांनी इंडस्ट्री गाजवली..

अंगणवाडी केंद्राचे रूप पालटत असून, बालकांचे मन अंगणवाडी केंद्रात रमत आहे. हे सौंदर्यीकरण टिकविण्याची जबाबदारी अंगणवाडीसेविका व मदतनीस यांना घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे. यंदा तर पटसंख्या वाढली आहे. अंगणवाडी डिजिटल करण्यात आल्या आहेत.

''अंगणवाडीतील बालकांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी थोरपुरुष, शास्त्रज्ञ, पोलिस, सैनिक व नेते यांच्याविषयी चित्रात्मक माहिती, तसेच भौमितिक, सांख्यिकी आकृतींद्वारे माहिती देणे गरजेचे आहे.

यासाठी अंगणवाडी इमारतींच्या भिंती बोलक्या करण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. जिल्ह्यातील २०२२-२०२३ व २०२३-२०२४ मध्ये मंजूर असलेल्या आदिवासी व बिगरआदिवासी क्षेत्रातील सर्व अंगणवाडी बांधकामे बोलकी भिंत, चित्र पद्धतीनुसार आहेत. जिल्ह्यात एकूण २८४ अंगणवाडींची बांधकामे या पद्धतीनुसार झाली आहेत.''- शैलजा नलावडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम ३, जिल्हा परिषद

Shailaja Nalavde
Womens Day Special : वयाच्या 22 व्या वर्षी गर्भाशय काढले जाते आणि ती बनते परमनंट ऊसतोड मजूर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com