YCMOU News : कमी क्रेडिटचे ऑनलाइन शिक्षणक्रम होणार उपलब्‍ध; ‘मुक्त’ चा राज्‍य शासनासह विद्यापीठांशी सामंजस्य करार

YCMOU : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढाकाराने विविध सामंजस्‍य करार करण्यात आले.
Yashwantrao Chavan on the initiative of Maharashtra Open University for his presence on the occasion of the Memorandum of Understanding with the Government of Maharashtra and various universities.
Yashwantrao Chavan on the initiative of Maharashtra Open University for his presence on the occasion of the Memorandum of Understanding with the Government of Maharashtra and various universities.esakal

YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुढाकाराने विविध सामंजस्‍य करार करण्यात आले. मुंबईतील मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, तसेच मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कोल्‍हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि मुंबईतील एमएनडीटी महिला विद्यापीठ या पाच विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करण्यात आला. (nashik YCMOU Low credit online courses to be available for student marathi news)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रम तयार करून उपलब्ध करून द्यावे व पोर्टलवर टाकावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन शिकण्याचा मुद्दा समाविष्ट असून यासाठी केंद्र शासनाने स्वयंम हे पोर्टल सुरू केले आहे.

तथापि, त्याचे शुल्क अधिक असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या शुल्कात आणि त्यांच्या शैक्षणिक आणि औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कमी क्रेडिटचे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (latest marathi news)

Yashwantrao Chavan on the initiative of Maharashtra Open University for his presence on the occasion of the Memorandum of Understanding with the Government of Maharashtra and various universities.
YCMOU News: राज्यपालांच्या दौऱ्यामुळे मुक्त विद्यापीठ रस्त्याची मलमपट्टी! दौऱ्यामुळे तात्पुरता दिलासा

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

एसएनडीटी विद्यापीठ प्रतिनिधी डॉ. जयश्री शिंदे, मुक्त विद्यापीठातर्फे कुलसचिव दिलीप भरड, डॉ. कविता साळुंके, डॉ. राम ठाकर, डॉ. सुरेंद्र पाटोळे उपस्थित होते. या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, उपसचिव अशोक मांडे आदी उपस्थित होते.

Yashwantrao Chavan on the initiative of Maharashtra Open University for his presence on the occasion of the Memorandum of Understanding with the Government of Maharashtra and various universities.
YCMOU News : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आज मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com