Nashik: खिचडीला दरवाढीची फोडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खिचडी

येवला : खिचडीला दरवाढीची फोडणी

sakal_logo
By
संतोष विंचू -सकाळ वृत्तसेवा

येवला : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या खिचडी शिजविण्याच्या दरात कोरोनाच्या ब्रेकनंतर प्रतिविद्यार्थी दरामध्ये अखेर सुधारणा करण्यात आली आहे. मिळणाऱ्या अनुदानात खर्च करताना कसरत होत असल्याने शासनाने खिचडी शिजवण्याच्या दरात ११ टक्के दरवाढ केली आहे. इंधन, गॅस, किराणा दर गगनाला भिडल्याने यंदा अधिक प्रमाणात वाढ करून दिलासा दिला आहे.

आहार शिजविण्यासाठी लागणारे इंधन (गस) दरवाढ तसेच भाजीपाला दरवाढ रुपयात होत असताना आहार शिजवण्यासाठी व इतर खर्च पैशात वाढवला आहे. शासनाने अन्न शिजविण्याच्या दरासाठी प्रती दिन प्रती विद्यार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ४ रुपये ४८ पैसे तर उच्च प्रथमिक वर्गासाठी ६ रुपये ७१ पैसे निच्छित करण्यात येऊन त्याचा लाभ दिला जात होता. यापूर्वी शासनाने साडेसात टक्के दरवाढ मंजूर केली आहे. २०१९ मध्ये फक्त ५.३५ टक्केच दरवाढ करण्यात आली होती. आता १०.९९ टक्के दरवाढ मंजूर केली आहे.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

पहिली ते पाचवी म्हणजेच प्राथमिक गटासाठी ४९ पैसे व उच्च प्राथमिक गटासाठी ७४ पैसे प्रतीदिन प्रती लाभार्थी अशी दरवाढ आता केली असून आता पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ४ रुपये ९७ पैसे तर सहावी ते आठवीसाठी प्रत्येक दिवसाला प्रत्येक विद्यार्थ्याला ७ रुपये ४५ पैसे अनुदान मिळणार आहे. ही दरवाढ एक एप्रिलपासून लागू होणार आहे.

सुधारित दराचा फरक मिळणार

ग्रामीण भागात शाळांना तांदूळ व त्यासाठी लागणारा इतर धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो. प्रति दिनासाठी तरतूद केलेल्या खर्चातून प्राथमिक गटासाठी ३ रुपये ८ पैसे धान्यादी माल पुरविण्यासाठी तर १ रुपये ८९ पैसे इंधन आणि भाजीपाल्यावर खर्च करता येतील. उच्च प्राथमिक गटासाठी ४ रुपये ६१ पैसे धान्यादी माल पुरविण्यासाठी तर २ रुपये ८४ पैसे इंधन आणि भाजीपाल्यावर खर्च करता येणार आहे.

शहरी भागात स्वयंसेवी संस्था, बचत गट यांच्यामार्फत तयार आहाराचा पुरवठा केला जातो. यासाठी केंद्रीय स्वयंपाक गृहाचा वापर होतो. त्यामुळे प्राथमिक गटासाठीचे चार रुपये ९७ पैसे व उच्च प्राथमिक गटासाठीचे ७ रुपये ४५ पैसे आहार तयार करणाऱ्या यंत्रणेला देण्यात येणार आहे. सुधारित दर एक जुलैपासून लागू होणार असून मागील फरक देखील बचत गटांन मिळणार आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

दोन वर्षांनंतर पुन्हा खिचडी

शाळांसाठी खिचडीची योजना तापदायक असून तिचा दर्जाही राखणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक शाळा बचत गटामार्फत खिचडी शिजवतात. त्यांना या दरवाढीचा फायदा होणार असून आता शाळा सुरू होत असल्याने गेले दीड-दोन वर्षे विस्कळीत असलेली ही खिचडी पुन्हा एकदा शाळेत शिजली जाणार असून त्याची चव विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार आहे.

loading image
go to top