Faizan Ansari, a young man on a pilgrimage from Mumbai to Delhi
Faizan Ansari, a young man on a pilgrimage from Mumbai to Delhiesakal

Poonam Pandey Post : पूनम पांडेवर कारवाईसाठी तरुणाची पायी दिल्लीवारी

Nashik News : मुंबई अंधेरी येथून शुक्रवारी (ता.२३) पदयात्रेस सुरवात करून रविवारी (ता.२५) द्वारका, नाशिक येथे तो दाखल झाला.
Published on

जुने नाशिक : प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी मॉडेल पूनम पांडे विविध स्टंट करत नागरिकांच्या सामाजिक भावना दुखावत आहे. काही महिन्यांपूर्वी तीने कॅन्सरमुळे निधन झाल्याची अफवा पसरविली. त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीती निर्माण झाली.

तिच्या अशा कृत्याविरुद्ध कारवाईसाठी मुंबई येथील फैजान अन्सारी या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी मुंबई ते दिल्ली पायी वारी सुरू केली आहे. (nashik young man walks mumbai to Delhi to take action against Poonam Pandey marathi news)

मुंबई अंधेरी येथून शुक्रवारी (ता.२३) पदयात्रेस सुरवात करून रविवारी (ता.२५) द्वारका, नाशिक येथे तो दाखल झाला. येथून गुजरात, राजस्थानमार्गे दिल्ली येथे जाणार असून यासाठी दैनंदिन तीस ते चाळीस किलोमीटरचा पायी प्रवास करणार असल्याचे त्याने सांगितले.

पूनम पांडेने कुठल्या ना कुठल्या स्टंटबाजीने प्रकाश झोतात राहत नागरिकांच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे तिच्याकडून स्टंटबाजी करत सोशल मीडियाचा गैरवापर होऊन नागरिकांच्या मनावर परिणाम होत असल्याचा आरोप करीत फैजान याने तिने असे प्रकार थांबवण्यासाठी पूनमविरुद्ध मुंबई काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

Faizan Ansari, a young man on a pilgrimage from Mumbai to Delhi
Union Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्पाने 'मायबाप सरकार' ही प्रतिमा बदलली?

कानपूरमध्येही पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली आहे. अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. यामुळे कारवाईसाठी शेवटी त्याने नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी त्याने मुंबई ते दिल्ली पदयात्रा सुरू केली आहे.

"पूनम पांडेवर कठोर कारवाई व्हावी. मागणी मान्य न झाल्यास उपोषण करणार."

- फैजान अन्सारी, तक्रारदार तरुण

Faizan Ansari, a young man on a pilgrimage from Mumbai to Delhi
Maharashtra Budget Railway: फलटण पंढरपूर रेल्वेला मान्यता, विदर्भातील शकुंतला पुन्हा सुरू होणार, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com