esakal | "मोदीजी, रामराज्य आणण्याची स्वप्ने दाखवता आणि दुसरीकडे गुंडाराज फोफावतोय!" राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

letter to modi.jpg

आपण कंगणासारख्या अभिनेत्रीला सुरक्षा देता. मात्र महिला, युवती सुरक्षे वाचून वंचित आहे. कालच्या घटनेत बलात्कारीत पिडीतेचा मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन न करता पोलिस यंत्रणेमार्फत अंत्यविधी उरकला जातो हे देखील भयावह आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाला असे आदेश कोणी दिले?

"मोदीजी, रामराज्य आणण्याची स्वप्ने दाखवता आणि दुसरीकडे गुंडाराज फोफावतोय!" राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना पत्र

sakal_logo
By
संदीप पवार

नाशिक : (डीजीपी नगर) उत्तर प्रदेशात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचारांबाबत दोषींवर कडक कारवाई करावी. यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राव्दारे गुरुवारी (ता. 1) रोजी विनंती केली आहे. 

मोदी साहेब, गुंडाराज फोफावतोय...

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाजपचे सरकार आहे. १४ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशात हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित युवतीवर चौघांनी मिळून सामुहिक बलात्कार केला. यानंतर पिडीतेला दिल्लीच्या सफदरगंज रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १६ दिवसानंतर तिला मृत्युला सामोरे जावे लागले. हे नक्कीच संतापजनक आहे. आपण देशात ज्याप्रमाणे जाहिरातबाजी करतो. त्यापेक्षा उलटच उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला दिसतो. या कारणाने महिला, युवती, सर्वसामान्य जनता सुरक्षित नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. आपण देशात रामराज्य आणू अशी स्वप्ने जनतेला दाखवता मात्र आपल्या काळात गुंडाराज फोफावत चालला. 

पोलिस प्रशासनाला असे आदेश कोणी दिले? 

उत्तर प्रदेशात देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उभारण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था, सक्षम पोलिस यंत्रणा उभी करा. जेणेकरून महिलांना राज्यात अत्याचाराला बळी पडावे लागणार नाही. आपण कंगणासारख्या अभिनेत्रीला सुरक्षा देता. मात्र महिला, युवती सुरक्षे वाचून वंचित आहे. कालच्या घटनेत बलात्कारीत पिडीतेचा मृतदेह कुटुंबांच्या स्वाधीन न करता पोलिस यंत्रणेमार्फत अंत्यविधी उरकला जातो हे देखील भयावह आहे. तेव्हा पोलिस प्रशासनाला असे आदेश कोणी दिले? याचीही चौकशी झाली पाहिजे. तसेच अत्याचारामधील आरोपींना जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने महिला पदाधिकारी केली.

हेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्रपेटीत पत्र पाठवितांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे, कार्याध्यक्ष नगरसेविका सुषमा पगारे, आसिया शेख, पुनम शहा, मिनाक्षी गायकवाड, स्वाती बिडला, सरोज गरूड, भारती चित्ते, शाकेरा शेख, दुर्गा कल्याणी  आदी महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा >  ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन! नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा

loading image