शेतकरी-भाजी विक्रेत्यांची लूट..इथे शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी-विहिंप एकत्र 

bhagur vegetables.jpg
bhagur vegetables.jpg

नाशिक : लॉकडाउनमुळे भगूर पालिकेने आठवडेबाजार व मार्केट बंद करून भगूरला जोडणारे रस्ते बंद केल्याने शेतकरी, किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशाच भाजी मार्केटच्या ठेकेदाराने अडवणूक सुरू केल्याने त्याच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, यात विश्‍व हिंदू परिषदेच्या मोठ्या नेत्यांनी स्वतःची जागा विक्रेत्यांना बसण्यासाठी देऊन लूट थांबविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे भगूरला सत्ताधारी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस व विश्‍व हिंदू परिषद, असा सरळ संघर्ष सुरू झाला आहे. 

शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी-विहिंप एकत्र 
भगूर पालिकेत शिवसेनेची सत्ता असून, शिवसेना शहरप्रमुख विक्रम सोनवणे यांना मार्केट कामाचा ठेका 1 ऑगस्ट 2019 ते 31 मार्च 2020 पर्यंत (आठ महिने) होता. मार्केट ठेकेदारांची निविदा संपूनही मार्केट फी वसुली सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात आवाज उठविला. विश्‍व हिंदू परिषदेचे नेते एकनाथराव शेटे यांनी तात्पुरत्या स्वरूपात स्वतःची जागा शेतकरी विक्रेत्यांसाठी उपलब्ध करून देत लूट थांबविण्याची मागणी केली. 

मार्चनंतरही वसुली कशी? 
ठेकेदाराने पाच ठिकाणी पालिकेने दरपत्रक फलक स्वखर्चाने लावणे बंधनकारक केले आहे. भगूर शहरात कुठेही दरपत्रक लावले नसून भाजीविक्रेते व शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसह इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आरोप आहेत. 1 ऑगस्ट 2019 ते 31 मार्च 2020 या आठ महिन्यांची निविदा सात लाख दहा हजारांची आहे. त्यामुळे मार्चनंतर मेपर्यंत वसुलीचे काय, असा प्रश्‍न आहे. 

...असे आहेत दर 
- हातगाडी फळे, ऊस, शेंगदाणे, धान्य 30 रुपये 
- मिठाई, किराणा, बांगडी दुकाने 3.50 प्रतिचौरस मीटर 
- मासे, बोंबिल विक्रेते दुकान चार रुपये प्रतिचौरस मीटर 
- फळे, भाजीपाला, हातगाडी 30 रुपये 
- भाजी पाटी किंवा क्रेट्‌स सहा रुपये प्रतिक्रेट्‌स 
- प्रतिदुकान स्टॉल भाडे 40 किंवा 50 रुपये 

कुणी हरकत घेऊन त्रास देऊ नये.
वेताळबाबा रोडवरील प्लॉट सिटी सर्व्हे नंबर 76/8/4 ही जागा आमच्या कुटुंबाची खासगी जागा आहे. शेतमाल विकणाऱ्यांना जागेत विनामूल्य व्यापार करण्यास आमची परवानगी आहे. अन्य ठिकाणी व्यवस्था होईपर्यंत त्यांना कुणी हरकत घेऊन त्रास देऊ नये. भाजीविक्रेते व शेतकऱ्यांकडून कुठले शुल्क आकारू नये. - एकनाथराव शेटे, प्रांतीय अध्यक्ष विश्‍व हिंदू परिषद 


शेटेसरांनी स्वतःच्या मालकीची जागा शेतकरी व भाजी विक्रेत्यांना दिली आहे. या भागातील कॅन्टोन्मेंट आणि पालिकेचे ठेकेदार पोलिसांना फोन करून भाजीविक्रेते व शेतकऱ्यांवर कारवाया करायला लावतात. ही अडवणूक थांबली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पालिका व ठेकेदाराविरोधात आंदोलन करेल. - प्रेरणा बलकवडे, महिला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com