New Sand Policy : जिल्ह्यात वाळूंसाठी 13 घाटांवर 90 हजार ब्राससाठी निविदा

sand
sandesakal

New Sand Policy : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यात १३ घाटांवर साधारण ९० हजार ब्रास वाळूसाठी निविदा प्रक्रियेला गती आली आहे. आज देवळा भागातील घाटांसाठी निविदांची प्रक्रिया संपली. तर उर्वरित घाटांसाठी ९ मे पर्यत निविदा उघडल्या जातील.

अवैध वाळू उपाशासह चोरी रोखण्यासाठी शासनाने स्वत: वाळू धोरण ठरवून लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार जागेवर वाहतूक खर्चाचा भार उचलून नागरिकांना स्वतः वाळू नेता येणार आहे.

नाशिकला जिल्ह्यातील गिरणा, मोसम या वाळू उपाशासाठी प्रसिद्ध नदी पात्रावरील १३ घाटांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. (New Sand Policy Tender for 90 thousand brass at 13 ghats for sand in district nashik news)

नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू झालेल्या पहिल्या वाहिल्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज देवळा भागातील निविदा प्रक्रियेची मुदत होती.मालेगाव, कळवण, देवळा आणि बागलाण या चार तालुक्यांमधील प्रमुख १३ वाळू घाटांचा समावेश आहे.

मालेगाव तालुक्यातील पाच घाटांवरील वाळूचा उपसा या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. तसेच, या संबंधित सर्व १३ वाळू घाटांमधून ९०,४३९ ब्रास वाळूसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

त्यात वाळू घाटांपासून जवळच साठवणुकीचा डेपोही असणार आहे. त्याप्रमाणे सहा डेपोंची जागा जिल्हा प्रशासनाने निश्चित केली असून वाहतुकीचा खर्च वाढू नये, यासाठी वाळू घाटापासून जवळच हे डेपो असणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

sand
Bosch Employees : ‘बॉश’कडून कामगारांना कामावर घेण्यास नकार; कर्मचाऱ्यांचा लढा चालू ठेवण्याचा निर्णय

तालुका नदी गाव -घाट क्षेत्र (हेक्टर) लांबी (मि) रुंदी (मि) खोली (मि) परिमाण (ब्रास)

कळवण गिरणा नाकोडे १.०८ १८० ६० ०.३ ११४५

कळवण पुनंद ककाणे १.०२ ४१० २५ ०.३ १०८६

मालेगाव गिरणा आधार बुद्रूक १.३७ ४७३ २९ १ ४८४७

मालेगाव गिरणा पाटणे १.०६ १८३ ५५ १ ३५५७

मालेगाव गिरणा चिंचावड २.१५ ४३० ५० १ ७५९७.१७

मालेगाव गिरणा आधार खुर्द २.०० ४०० ५० १ ७०६७.१३

मालेगाव गिरणा नरडाणे १.८५ ३१० ३५ १ ३८३३

देवळा गिरणा महालपाटणे ३.०० ६०० ५० १ १०६०१

देवळा गिरणा लोहणेर-सावकी ३.३ ६६० ५० १ ११६६१

देवळा गिरणा विठेवाडी-सावकी २.७५ ५५० ५० १ ९७१७

देवळा गिरणा भउर २.५० ५०० ५० १ ८८३४

बागलाण मोसम नामपूर ३.६ ६०० ६० ०.५ ६३६०

बागलाण गिरणा धांद्री २ २ ४०० ५० २ १४१३४ ९०४३९

sand
MSRTC Women Ticket discount: ऑनलाइन तिकीट बुकींगवर 50 टक्के सवलतीबाबत संभ्रम; खासगी ॲप्लिकेशनवर येताय अडचणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com