esakal | जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 699 ने घट; आढळले 3 हजार 683 पॉझिटिव्‍ह

बोलून बातमी शोधा

corona update
जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 699 ने घट; आढळले 3 हजार 683 पॉझिटिव्‍ह
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्‍यात सोमवारी (ता.26) दिवसभरात 34 रुग्‍णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिवसभरात तीन हजार 683 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या चार हजार 382 होती. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत 699 ने घट झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 47 हजार 838 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

सोमवारी झालेल्‍या 34 मृतांमध्ये सर्वाधिक चोवीस मृत नाशिक ग्रामीणमधील होते. तर नाशिक शहरातील नऊ बाधितांचा मृत्‍यू झाला. मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका बाधिताचाही कोरोनाने बळी गेला आहे. तर नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील दोन हजार 014, नाशिक ग्रामीणमधील एक हजार 540, मालेगाव महापालिका क्षेत्रातील पन्नास, तर जिल्‍हा बाहेरील 79 रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार

सायंकाळी उशीरापर्यंत सहा हजार 752 रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. तर जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात चार हजार 764 रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार 435 रुग्‍ण आहेत. जिल्‍हा रुग्‍णालयात वीस तर डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात चोवीस रुग्‍ण दाखल झाले आहेत

हेही वाचा: प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा