esakal | कृषीमंत्र्याच्या लेकाचा विवाहसोहळा साध्या पद्धतीने; सोशल मिडीयावर नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

बोलून बातमी शोधा

dada bhuse son wedding
कृषीमंत्र्याच्या लेकाचा विवाहसोहळा साध्या पद्धतीने; सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार व खासदार राजन विचारे यांची कन्या लतिशा यांचा विवाह आज सकाळी येथील मनमाड चौफुलीवरील आनंद फार्म येथे अत्यंत साध्या पध्दतीने अवघ्या वीस ते पंचवीस जणांच्या उपस्थितीत पार पडला.

एकनाथ शिंदे विवाहसोहळ्यास उपस्थित

वधू-वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. शिंदे हे खासगी हेलीकाप्टरने येथील पोलिस परेड मैदानावर आले. तेथून कारने विवाहस्थळी रवाना झाले. भुसे व विचारे कुटुंबीयांना त्यांचे स्वागत केले.

देखावा होता लक्षवेधी

आनंद फार्म मध्ये यानिमित्ताने कृषीप्रधान देखावा उभारण्यत आला होता. लग्नातील उपस्थित वऱ्हाडींचे हा देखावा लक्ष वेधून घेत होता.

हेही वाचा: दीडशे किलोमीटरचा प्रवास अन् प्लाझ्मा दानातून शिक्षकाने ओतला ‘प्राण’!

डिजिटल माध्यमातून मान्यवरांच्या शुभेच्छा

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून झालेल्या विवाहसोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ आदींसह राज्यातील विविध विभागांचे मंत्री, विधीमंडळ सदस्य तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी व सामान्य नागरिक, शिवसेना कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन करीत साध्या पद्धतीने झालेल्या या आदर्श विवाह सोहळ्याचे अनेकांनी कौतुक केले.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार