esakal | तो खेळ ठरला जीवाशी! 15-20 कुत्र्यांचा शिकार झाला अनिकेत, एक पाय निकामी
sakal

बोलून बातमी शोधा

dogs1.jpg

शेतकामात मग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना कुत्र्यांचा जोराजोराने भुंकण्याचा आवाज आला. त्यात लहान मुलगा वेदनेने विव्हळत असल्याचा देखील आवाज झाला. हातातली कामे टाकू सगळ्यांनी एकच धाव घेतली. अन् समोर जे दिसले ते थरारक अन् अंगावर काटा आणणारे होते. 

तो खेळ ठरला जीवाशी! 15-20 कुत्र्यांचा शिकार झाला अनिकेत, एक पाय निकामी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (दुगाव) शेतकामात मग्न असणाऱ्या शेतकऱ्यांना कुत्र्यांचा जोराजोराने भुंकण्याचा आवाज आला. त्यात लहान मुलगा वेदनेने विव्हळत असल्याचा देखील आवाज झाला. हातातली कामे टाकू सगळ्यांनी एकच धाव घेतली. अन् समोर जे दिसले ते थरारक अन् अंगावर काटा आणणारे होते. 

अनिकेत दिसला रक्ताने माखलेला...

गुरुवारी (ता.15) चांदवड तालुक्यातील दुगाव येथे दुपारच्या वेळी धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असणाऱ्या शेतकऱ्यांना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. तेव्हा शेतकरी धावतच आवाजाच्या दिशेने गेले. तेव्हा नऊ वर्षीय अनिकेत हा रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला. अनिकेत हा त्याचा त्याचा खेळण्यात मग्न असतांना अचानक पंधरा ते वीस कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्या कुत्र्यांमध्ये पिसाळलेली कुत्रे देखील होते. त्या कुत्र्यांच्या झुंडीने त्याच्या कपड्याच्या अक्षरश: चिंध्या केल्या होत्या. ग्रामस्थांनी अनिकेतला बराच वेळ श्वानांपासून वाचवायचा प्रयत्न केला. परंतु, श्वान सोडायला तयार नव्हते. शेवटी काठ्या मारून अनिकेतची श्वानांपासून सुटका करण्यात आली. रक्तबंबाळ अनिकेत वेदनेने विव्हळत पडला होता. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र अनिकेतचा पाय निकामी झाला आहे. त्यामुळे त्याला कायमचे अपंगत्व आले.

श्वानांच्या हल्ल्यात अनिकेत एक पाय गमवला...

जखमी अनिकेतला न्याय न मिळाल्यास मोकाट श्वान जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयात सोडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले आहे. यावेळी छत्रपती सेनेतर्फे कार्याध्यक्ष नीलेश शेलार, शहर संपर्कप्रमुख किशोर तिडके, क्षितिज मोरडे, सुनील गवळी, अभिषेक गवळी, तेजस गवळी,पीयूष निकुंभ आदी उपस्थित होते.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रसंग

नाशिक शहरातील मोकाट श्वान हे चांदवड भागात नागरी वस्तीजवळ सोडण्यात येतात. याच श्वानांच्या हल्ल्यात अनिकेतला एक पाय गमवावा लागला. तसेच त्याला कायमचे अपंगत्व आले आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग ओढवला. संबंधित ठेकेदाराची चौकशी करून ठेका रद्द करावा. अनिकेतच्या उपचाराचा खर्च शासनाने व ठेकेदाराने खर्च व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे छत्रपती सेनेने केली आहे.

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

loading image
go to top